पोट निवडणूकींचे निकाल.

पोट निवडणूकींचे निकाल.
आज  May 31, 2018.  देशातील ४ लोकसभा आणि ११ विधान सभा पोट निवडणूकींचे लागलेले निकाल हे भाजपाच्या द्रुष्टीने चिंताजनक असे आहेत.
१४ पैकी केवळ २ जागा भाजपाला मिळाल्या.
या पोस्ट पुरते आपण विधानसभा निकाल बाजूला ठेवून केवळ लोकसभा निकालांविषयी बोलूया.
महराष्ट्रात सामना १-१ असा बरोबरीने सुटला असला तरी भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजवून गेला.
पालघर ची जागा भाजपाने राखली ती तोंडाला फेस आल्यानंतर.
शिवसेनेने वणगांच्या मुलाला पळवल्यानंतर गिरीश महाजन यांनी राजेंद्र गावित यांचा गेम केला त्यामुळे सीट वाचली. पण ११ महिन्यांनी ही सीट पुन्हा निवडून येईल याची शाश्वती नाही.
प्रथमच ही जागा लढणार्या शिवसेना ला २.६० लाख मते पडली ही गंभीर बाब आहे.
या मतांमध्ये कै. चिंतामण वणगा साहेबांच्या हितचिंतकांनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेला मतदान केले असणार हे वादातीत आहे.
बहुजन विकास आघाडी ला मिळालेली २.२५ लाख मते व त्याबरोबर कांग्रेस आणि कम्युनिस्ट ना मिळालेली एक लाख मते ही एक केली तर ही सीट भाजपाच्या हातून नक्की जाते.
त्यामुळे भाजपा ने या विजयाबद्दल जास्त स्तोम माजवू नये.
गोंदिया ची जागा गेल्याचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्की बसणार. त्यातून ही जागा विदर्भात होती. हा विजय प्रफुल्ल पटेल यांच्या रणनिती चा आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.
उत्तर प्रदेश मधील कैराना चा पराभव ही भाजपासाठी चिंतेची बाब व विरोधकांना उत्साह देणारी आहे.
मुख्यमंत्री आदित्य नाथ यांच्या effectiveness बद्दल प्रश्न चिन्ह उभे राहून त्यांना बदलण्याबाबत सुद्धा विचार पक्षाला करावा लागेल. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला लागोपाठ तीन मोठे पराभव भोगावे लागले आहेत. विरोधकांना एकत्र येण्यापासून ते थांबवू शकत नाहीत असे वाटते.
२०१८ हे धोक्याचे वर्ष आहे असे मी सारखे म्हणतो.
हे निकाल त्याला पुष्टी देतात.
पक्ष नेतृत्व यापासून योग्य बोध घेईल ही अपेक्षा..
@ दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained