*समाजामध्ये LEADERSHIP दोन प्रकारच्या असतात.*

*समाजा मध्ये LEADERSHIP दोन प्रकारच्या असतात.*
१) Image Based Leadership
२) Knowledge Based Leadership

*1)Image based leadership*
 ही आपल्याला सर्वच ठिकाणी बघायला मिळते. अशा leadership कडे गाडी असते, बंगला असतो आणि चमच्यांचा लवाजमा असतो. असे leader डोळ्यावर गॉगल लावतात आणि काळी काच लाऊन पांढ-या शुभ्र गाडीतून फिरतात. त्यांच्यामागे त्यांचे चमचे, दलाल
हुजरेगिरी करतात. विकासाच्या नावाखाली अशी leadership समाजात पैशाच्या
जोरावर image तयार करतात. परंतू ही Image केवळ एका
कुरकुरेच्या पाकीटासारखी असते. ज्यात 90% हवा असते. अशा
लिडरशीप पासून समाजाचे कधीही पोट भरत नाही. ते समाजात कधी फिरकत नाही ते समाजाला कोणतेच हक्क अधिकार मिळवून देऊ शकत नाही, कारण त्यांचा विश्वास चमकधमक, फोटोसेशनवर जास्त असल्याने दुस-यांसाठी लढत नाही !
*2) Knowledge Based Leadership*
आपण बघतोच की ही कुठलाही दिखावा करत नाही. समाजात मान-सन्मान मिळावा म्हणून खोटे आश्वासने देत नाही. त्याचं उद्दिष्ट केवळ आणि केवळ आपल्या समाजाच्या हितासाठी कार्यरत राहणे, त्यांच्या हक्काप्रती जागरुक राहून त्यांना समाजातील घटकाला न्याय मिळवून देणे, समाजात प्रबोधनात्मक चळवळ
निर्माण करणे असे असते. अशी लिडरशीप आपणास हजारात एक
व्यक्ति पाहण्यास मिळते पण अशा लीडरशिप ला समाजातील अनेक लोकांचा विरोध सहन करावा लागतो
मात्र ही लीडरशिप तावुन सुलाखूंन निघते .या लीडर शिपला आयुष्यत यश  मिळातेच व ते लोकांच्या मनावर शेकडो वर्ष राज्य करतात समाजातील मोठ्या परिवर्तनाचा पाया ते रचत असतात.
*म्हणून समाजातील सर्व प्रकारच्या लोकांनी या दोन लिडरशीप मधील फरक ओळखून आपला लिडर कोण हे ठरवावे.*
समाजाने वरवर न बघता त्यातील गोष्टींकडे बघायला पाहिजे. 
असे नेतृत्व करणार्याच्या खंबीरपणे पाठीशी उभे  रहा,आपला विकास दूर नाही.*

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained