मुंबई-अलीबाग सागरी मार्गावरील रो-रो बोटसेवा प्रकल्प जून 2018 ला सुरू

मुंबई-अलीबाग सागरी मार्गावरील रो-रो बोटसेवा प्रकल्पाचे जून 2016 ला टेंडर निघाले होते, आता आठ दिवसात हि योजना सुरु होईल. यामुळे मुंबई-गोवा प्रवास ३ तासाने कमी होणार आहे. दुसर्या टप्यात याच रो रो बोटसेवेचा सिंधुदुर्ग- गोव्यापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे.

रो-रो (Ro-Ro) बोटसेवेची वैशिष्ट्ये:-

१) मुंबई-मालवण सागरी अंतर फक्त ५ तासात

२) खोली फक्त २ मीटर असल्याने सिंधुदुर्गातील सर्व बंदरात थांबेल

२) पूर्ण एअर कंडिशन बोटीचे प्रवासी तिकीट फक्त ५००/- रू

३) भाऊचा धक्क्यावर रो-रो बोटीत कार चढवा मालवण सर्जेकोटला बोटीतून कार उतरवा. तिकीट ड्रायवरसकट फक्त १५००/- रू

४) भाऊचा धक्क्यावर रो-रो बोटीत मोटरसायकल चढवा वेंगुर्ल्याला बोटीतून मोटरसायकल उतरवा. मोटरसायकलमधून पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गाची मोटरसायकल वरून मनसोक्त रपेट करा. तिकीट ड्रायवरसकट फक्त १५०/- रू

५) आंबा- माशांचा ट्रक देवगड आनंदवाडी बंदरात रो-रो बोटीत चढवा केवळ ८ तासात सदर ट्रक नेरूळ बंदरातून वाशी मार्केटमध्ये हजर. तिकीट ड्रायवरसकट फक्त ७०००/- रू औद्योगीकरणाला चालना मिळून कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र, बेळगाव येथील माल निम्या किंमतीत मुंबईत आणता येईल. शेतीमाल/आंबे/फलोत्पादन यांची नासाडी थांबून शेतीमाल निर्यातीस चालना .

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained