मराठी मराठी करून..17 शे पिढ्या बसुन खातील एवढी माया या लोकांनी गोळा केलीय..

खरच आपण विचार करायला हवा 

मराठी मराठी करून..17 शे पिढ्या बसुन खातील एवढी माया या लोकांनी गोळा केलीय.. आणि आमचा बाबल्या अजुनही त्यांचे MSG फॉरवर्ड करतोय... झेंडे मिरवतोय...



मराठी मुद्दा, मराठी माणुस,मराठी अस्मिता ह्या साठी चाललेला लढा...(खरं म्हणजे याला लढा म्हणावं का? हाच मोठा प्रश्न आहे.) हा खरोखर प्रामाणिक आहे का?

१९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली हाच मराठी मुद्दा घेऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी... पहिल्याच दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी "मद्रासी समाजा" विरोधात घोषणा दिली..

*"उठाव लुंगी बजाव पुंगी"*
झालं मेळाव्याहुन परतताना शिवसैनिकांनी उडप्यांच्या हॉटेल्सवर हल्ले केले..

परिणाम काय?

आज २०१७ मधे तब्बल ५१ वर्षांनी या मुंबई महाराष्ट्रात याच शिवसेनेच्या नाकावर टिच्चुन (याच सेना नेत्यांचे खिसे पैशानी भरुन ) याच मद्रास्यांचे लाखाच्या वर बार आणि रेस्टॉरंट आहेत.

दुसरी घोषणा साहेबानी दिली ती "गुजराती समाजा" विरोधात...

*"बायको तुमची पोरं आमची"*

परिणाम काय?

सर्व मोठ्या व्यापारावर आज गुजराती समाजाच वर्चस्व आहे आणि मराठी माणुस त्यांच्याकडे नोकर म्हणुन राबतोय.

तिसरी घोषणा..
"युपी बिहार मधल्या भैयां विरोधात"

*"एक बिहीरी लाख बिमारी"*

नंतर काय झालं?

याच मराठी माणसांचा कैवार घेणा-या शिवसेनेनी चक्क "सेना भवनात" *उत्तर भारतीय महासंघाची* स्थापना केली ही मराठी माणसाच्या कोणत्या भल्या साठी?

*"दोपहर का सामना"* हे हिन्दि भाषिक वृत्तपत्र मराठी भाषा वाढीसाठी होतं का?

५१ वर्ष प्रत्येक निवडणुकीत एकच प्रचार.. *"मुंबई महाराष्ट्रा पासुन वेगळी होणार.."*

बिचारा मराठी माणुस घाबरुन यांना निवडुन देत आला. मुुंबई महाराष्ट्रा पासुन वेगळी झाली नाही पण गिरणी कामगार मात्र देशोधडीला लागला, मराठी माणुस मुंबई सोडुन विरार, नालासोपारा, बदलापुरला पळाला.

परप्रांतिय मात्र याच मुंबईत स्थिरावलाच नाही तर मजबुत झाला. मग *वाघासारखी* सेना असताना हे सर्व का थांबवु शकली नाही.

पुढे तोच *मराठी मुद्दा* घेऊन राज ठाकरेंनी २००६ मधे "मनसे" ची स्थापना केली. ११ वर्ष झाली मराठीची परिस्थिती तीच उलट अजुनही बिकट झाली.

का नाही या दोनही पक्ष प्रमुखांनी मराठी तरुणांना व्यवसायात उतरण्यासाठी मार्गदर्शन केलं?

का मराठी मुलांना हे नेते गुंडगीरी करायला लावतात?

मराठी तरुण मार्गाला लागणं हे या दोनही पक्षांना परवडणारं नाही हेच या मागील सत्य आहे.

मराठी मुद्दा निकालात निघाला तर या दोनही पक्षांकडे कोणताच मुद्दा शिल्लक राहिलेला नसणार हे ही एक सत्य आहे.

आज मुंबई मधली एकही बाजारपेठ अशी नाही की जिथे मराठी माणसांच वर्चस्व आहे.

मराठी साठी गळा काढणारे हे कुटुंब एकही मराठी शाळा वाचवु शकले नाहीत.

दुकानांवरच्या पाट्या मराठीत लावाव्या म्हणुन आंदोलन करणा-यांच्या मुलांच्या साखरपुड्याच्या आमंत्रण पत्रिका इंग्रजीत छापतात.

एक शहर म्हणुन तेथील नागरीकांना लागणा-या गरजेच्या वस्तुंचा पुरवठादार हा आज ९५% परप्रांतिय आहे.

आणि केवळ त्या मुळेच आज मराठी माणसं आपले सण साजरे करतायत, आपल्या पोटासाठी लागणारं अन्न- धान्य खरेदी करतायत.

कारण ह्या सर्वप्रकारच्या वस्तुंचा पुरवठा करण्यास मराठी माणुस पुर्णपणे असमर्थ आहे.

*आजचा मराठी तरुण करतोय काय?*

एक वर्ग जो उच्चशिक्षित आहे तो उठतो आणि परदेशात जातो....

दुसरा वर्ग मध्यम शिकलेला याच परप्रांतियांकडे नोकरी करतोय.

त्यातलाच काही वर्ग हा याच कुटुंबांची गुलामी करतोय.

बाकी फार मोठा वर्ग दोन्ही पक्षांच्या कार्यालयात आपला अमुल्य वेळ वाया घालवतोय, तर अनेक तरुण दारु पिण्यात व्यस्त.

*मग चुकतय कोण?*
परप्रांतिय, मराठी तरुण.....

पण बेरोजगार मराठी मुलांचा वापर करुन दोन नेते आपलं दुकान मात्र मस्त चालवत आहेत....हेच सत्य आहे.

विदारक सत्य आहे.... जाणीवपुरवक विचार करा...

Comments