नाणार कोकण इथे होणार असलेल्या प्रोजेक्ट बद्दल मला आलेली पोस्ट ... आपण ही वाचा आणि ठरवा ....खरे -खोटे ......

नाणार कोकण इथे होणार असलेल्या प्रोजेक्ट बद्दल मला आलेली पोस्ट ... आपण ही वाचा आणि ठरवा ....खरे -खोटे ......
........................................
आशियातील पाचव्या क्रमांकाचा मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प देशात होऊ पाहतोय... तेही महाराष्ट्रात. 
जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी अराम्को आणि भारत सरकारच्या मालकीच्या तीन पेट्रोलियम कंपन्या एकत्रितपणे महाराष्ट्रात हा प्रकल्प उभारू पाहत आहेत. रत्नागिरीमधील नाणार येथे हा प्रकल्प होऊ पाहतोय. 

सौदी अराम्को ही जगातील सर्वात मोठी तेल कंपनी. जगाच्या दैनंदिन तेलाच्या उलाढालीत सौदी अरेबियाचा वाटा जवळ जवळ ३०% आहे. सौदी अराम्को हि कंपनी सौदीच्या राजांच्या मालकीची, थोडक्यात हा ३०% वाटा  सौदी अराम्कोचा आहे. तर अशी हि सौदी अराम्को भारतातील कंपन्यांच्या सोबतीने आपल्या महाराष्ट्र तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प सुरु करू पाहत आहे. 

जवळजवळ तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रस्तावित प्रोजेक्ट आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या प्रकल्पातून दररोज तब्बल १२ लाख बॅरल्स इतक्या प्रचंड क्षमतेने तेलाचे शुद्धीकरण केले जाईल. तसेच सुमारे दोन लाख कोटी टन प्रतिदिन इतक्या महाप्रचंड क्षमतेने येथून रसायनांची निर्मिती होईल. ही रसायने प्लास्टिक, नाफ्ता अशा अनेक कारणांसाठी महत्त्वाची असतात. तसेच या प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणावर हायड्रोकार्बनशी संबंधित अनेक रसायने तयार होणार आहेत. खते, पेट्रोलियम जेली, कीटकनाशके ते नायलॉन अशा अनेक उत्पादनांसाठी ही रसायने लागतात. म्हणजे जी रसायने आपल्याला आयात करावी लागत आहेत तीसुद्धा आता देशांतर्गत उपलब्ध होऊ शकतील. 

भारत सध्या दिवसाला ४० लाख बॅरल्स तेल आयात करतोय. त्यातले २०% सौदी अराम्को कडून येते. काही आंतरराष्ट्रीय कारणांमुळे तेल उत्पादन कमी झाले कि देशात तुटवडा निर्माण होण्याची भीती कायम आपल्या डोक्यावर तालवारीसारखी लटकलेली असते. अशा वेळी आपल्याच देशात तेलाची इतक्या मोठ्या प्रमाणावर गरज पूर्ण करणारा प्रकल्प उभा राहत असेल तर त्याचे मुक्तहस्ते स्वागत करायला हवे.

या प्रकल्पासोबतच कोकणात वाहतुकीसाठी चौपदरी रस्त्याचे नियोजन आहे, बंदरे विकसित केली जाणार आहेत. परिसरात स्मार्ट सिटी उभारल्या जाणार आहेत. इतका मोठा प्रकल्प म्हणजे किमान पन्नास एक हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि तेवढाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतो. सोबत राज्याला मिळणार महसूल वेगळा. बंदरे विकसित झाल्यामुळे वाहतुक सुलभ होईल... खूप काही या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला मिळू शकतं. 

पण या प्रकल्पाला राजकीय लोकांकडून होणार विरोध पाहता आपल्याला आयुष्यभर मागासच जगायचंय का असा प्रश्न पडतो. एकीकडे नोकऱ्या नाहीत म्हणून ओरडायचं आणि दुसरीकडे एखादा चांगला प्रकल्प सुरु करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला खोडा घालायचा. असली वृत्ती महाराष्ट्राला मागे खेचत आहे. असतील स्थानिकांचे प्रश्न पण त्यावर उत्तर मिळेल ना.. लोकांच्या आवाजात आवाज मिसळला म्हणजे तुम्ही नेते होत नाहीत, तर लोकांना त्यांचे भले बुरे कशात आहे, त्यांना कशाने कसा फायदा नुकसान होऊ शकतो, कशामुळे त्यांचे कल्याण होऊ शकते यासारख्या बाबी त्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगणे म्हणजे खरे नेतृत्व असते.

आत्ताच राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐकत होतो. ते म्हणाले काहीही झालं तरी मी नाणार चा प्रकल्प होऊ देणार नाही... राज साहेबांकडून मला हि अपेक्षा नव्हती. किमान ते तरी समंजस भूमिका मांडतील अशी अपेक्षा होती. पण राजकारणापुढे तेही झुकले. याच भाषणात राज साहेब महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत म्हणून आकतांडव करत होते... इतर नेत्यांची हीच अवस्था आहे. 

किती हा विरोधाभास ? एकीकडे येणारे प्रकल्प होऊ द्यायचे नाही आणि ते प्रकल्प दुसरीकडे गेले कि पुन्हा आमचे प्रोजेक्ट पळवताय म्हणून ओरड करायची. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही तर साहजिकच गुजरात किंवा कर्नाटक मध्ये होईल. तेव्हा आपण काय करणार?

मुख्यमंत्री फडणवीस राज्यासाठी खरंच चांगलं काम करत आहेत. समृद्धी महामार्ग विदर्भाचे रुपडे पालटणारा ठरणार आहे तर हा प्रकल्प समस्त महाराष्ट्रासाठी वरदान ठरणार आहे. या प्रोजेक्ट ला विरोध करण्याआधी गुजरातमधील रिलायन्स च्या रिफायनरीला भेट देऊन पहा... त्या प्रोजेक्ट ची भव्यता डोळ्यात सुद्धा मावणार नाही इतकी आहे. तिथे कुणाचेही या प्रकल्पामुळे नुकसान झालेले नाही. मग इथे कसे होईल ? जे लोक विरोध करत आहेत त्यांच्या समस्यांवर उपाय शोधायचे कि त्यांच्या भावांना भडकावून आपली पोळी भाजून घ्यायची ? कित्येक वेळा समस्या नसतेच, लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून त्यांना भडकवले गेलेले असते. टाटा नॅनो चा पश्चिम बंगाल मधला प्रोजेक्ट असल्याच मुर्खपणामुळे गुजरातमध्ये हलवावा लागला होता.  

आपल्याकडे हि सवयच लागलेली आहे. कोणताही प्रकल्प येऊ घातला कि त्याला विरोध करायचा. लोकांना चिथवायचं, आंदोलने करायची, आणि या आंदोलनांच्या मागून आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचं.    

अशा प्रकारच्या मोठ्या प्रोजेक्ट्स मुळे आपोआपच जगभरातील इतरही मोठ्या कंपन्या महाराष्ट्राकडे आकर्षित होतील याचा आपण विचार का करत नाही? कि असा काही विचार करायचाच नाही असं ठरवलेलं आहे ? 
राज्याला समृद्ध करायचे असेल तर इंडस्ट्री शिवाय पर्याय नाही. लाखो बेरोजगारांना नोकऱ्या फक्त इंडस्ट्रीमुळेच मिळू शकतात. दुसरा कोणताही मार्ग नाही.  

इतके चांगले प्रोजेक्ट येऊनही आपण त्याला विरोध करणार असू तर आपले राजकारण आपल्याच प्रगतीच्या आड येत आहे, आपल्याच दिवाळखोरीला कारणीभूत ठरत आहे असेच म्हणावे लागेल.
फडणवीस तसे याबाबतीत खंबीर आहेत. समृद्धी महामार्ग प्रचंड राजकीय विरोध होऊनही त्यांनी मार्गी लावलाच, हा प्रोजेक्ट सुद्धा मार्गी लागेल यात शंका नाही. पण राजकारणापायी देशाच्याही मुळावर उठलेल्या राजकारण्यांचं काय करायचं ? 

नाणार प्रोजेक्ट ला एक महाराष्टाचा नागरिक म्हणून नक्कीच पाठिंबा द्यायला हवा...

👍👍माझा पाठिंबा आहे, म्हणूनच शेअर करत आहे, आपणही पुढे पाठवा।

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034