काँग्रेस नी काय केले ?

काँग्रेस नी काय केले ?

दयानंद, मोदींचे लंडन मधील भाषण ऐकले का ?
मी चाट पडलो कारण विचारणारा मित्र कांग्रेस चा होता.
मी नाही म्हटल्यावर तो उत्साहाने सांगू लागला की मोदी आपल्या भाषणात म्हणाले की भारताच्या प्रगती त आज पर्यंत च्या सर्व सरकारांचा हात आहे.
मी म्हटले की ते वादातीत आहे. मग मोदी निवडणूक प्रचारात कांग्रेस नी ६० वर्षात काहीच केले नाही असे म्हणतात ते किती खोटे बोलतात...तो मित्र आता वाद घालू लागला.
हे चित्र बर्याच जणांना अनुभवायला मिळत असेल.
खरे काय आहे? ६० वर्षात देशानी प्रगती केली नाही च का ? या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधणारा हा लेख:
- दयानंद नेने
हल्ली काही जणं काँग्रेस नी गेल्या पासष्ठ वर्षाच्या सत्ताकाळात कायकाय केलं हा हिशोब देतायत...!
ह्या समस्त 'दाणापाणी बंद' झालेल्या कॉपी-पेस्ट्यांना एकच प्रश्न आहे....!
भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या इतर देशांशी तुलना करून बघितलीत का हो कधी...?
अर्थात त्याचा फाॅरवर्डेड मेसेज कुणालाही आला नसेल म्हणून सांगतो...
भारत स्वतंत्र झाला, त्याच सुमारास/ त्या आधी दोन वर्ष चीन, जपान आणि जर्मनी ह्यांनी शुन्यातून पुन्हा उभं राहायला सुरवात केली होती.
सिंगापूर तर आपल्याबरोबरच स्वतंत्र झाला..
आज ह्या चार देशांची स्थिती आणि भारताची स्थिती ह्यात जमिन-अस्मानाचा फरक आहे हे तरी मान्य कराल की नाही...?
मग मला सांगा,
इतक्या वर्षात आधी नेहेरू, मग इंदीराबाई, मग राजीव, पुढे नरसिंहराव नी आता मनमोहनसिंग
इतक्या सगळ्या महान नेत्यांमधल्या
एकालाही का वाटलं नसेल की प्रत्येक घरात वीज पोहोचवावी..?
एकालाही का वाटलं नसेल देशाची आरोग्यव्यवस्था सुधारावी?
एकालाही का वाटलं नसेल घराघरात गॅस यावा...?
एकालाही का वाटलं नसेल दुष्काळ निवारणासाठी नदीजोड करावी?
एकालाही का वाटलं नसेल देशात घराघरात शौचालय असावं...?
एकालाही का वाटलं नसेल देशातल्या प्रत्येक माणसाकडे बँक अकाउंट असावं..?
एकालाही का वाटलं नसेल देशातला प्रत्येक गोष्टीत चाललेला भ्रष्टाचार समुळ उखडण्यासाठी काही योजना राबवावी...?
एकालाही का वाटलं नसेल प्रत्येक गरीबातल्या गरीब सर्वसामान्य माणसालाही विम्याचं संरक्षण मिळावं...?
एकालाही का वाटलं नसेल की जास्तीतजास्त लोकांना स्वयंरोजगारासाठी स्वस्तात कर्ज उपलब्ध करून द्यावं...?
एकालाही का वाटलं नसेल की देशात अधिकाधीक परकीय गुंतवणूक येण्यासाठी 'मेक ईन ईंडीया' सारखं अभियान राबवावं...?
एकालाही का वाटलं नसेल की देशात समान नागरी कायदा यावा...?
एकालाही का वाटलं नसेल की सरकारी सोयीसुविधा थेट लाभार्थ्याच्याच हाती पडतील अशी व्यवस्था आणावी?
एकालाही का वाटलं नसेल की सैन्यदलाच्या शस्त्रास्त्रांच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा?
एकालाही का वाटलं नसेल की टेक्नाॅलाॅजीच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा...?
------
काय मालक
ह्या प्रश्णांची उत्तर आहेत का कुणाकडे...?
काँग्रेस नी जे केलं ते तुम्ही सांगितलंत सोयीस्कररीत्या...
पण जे जे करायची गरज होती नी जे सत्तर वर्षात एकहाती सत्ता असूनही जमलं नाही त्याचं काय?
मला सांगा,
का आपल्या मेळघाटातल्या आणि त्यासारख्या दुर्गम भागात राहाणार्या आदीवासी भावंडांची मुलं सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असुनही कुपोषणानं मरत होती..?
का आपले गरीब बांधव सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असुनही साध्या रेशन ला मुकत होते..?
का देशभरातील हजारो गावं सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असुनही दरवर्षी पाण्यासाठी टॅंकर वर अवलंबून होती...?
का आमच्या आयबहीणींना सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असुनही रोज शौचाला जाण्यासाठी अंधाराची वाट बघायला लागत होती...?
का आमचे ग्रामीण बंधू सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असुनही साध्या वीजेला मुकले होते....?
का सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असुनही
आमच्याआमच्यातच जात धर्म पंथ ह्यात विभागणी होऊन देत मतांचं राजकारण केलं..?
-----
ह्याची उत्तरं देता येतील तर बघा जरा....
बाकी एक मात्र लक्षात ठेवा...
पासष्ठ वर्ष सत्ता राबवताना जर काँग्रेस नी वरील मुद्द्यांची व्यवस्थित हाताळणी केली असती तर मोदी साहेबांना उभं राहायची वेळच आली नसती....!
ह्या देशात काँग्रेसनी सगळ्यात जास्त काही केलं असेल तर भ्रष्टाचार...!
गरीबाच्या तोंडचा घास पळवून स्वतःचे नी आपल्या पित्त्यांचे खिसे भरणार्या ह्या पांढर्या कपड्यातल्या चोरांची तुम्ही डोळ्यावर झापडं ओढून कितीही भलामण केलीत तरी सर्वसामान्य माणूस आता जागा होऊन नीट विचार करू लागलेला आहे....!
त्यामुळे काँग्रेसनं काय केलं ह्यापेक्षा काँग्रेसचं काय चुकलं ह्याचा विचार केलात नी त्याप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न केलात तरच काहीतरी होऊ शकेल....
अन्यथा कठीण आहे....!

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034