करताय कम्युनिस्टाना एक्स्पोज ...?

शेतकरी मोर्चा कव्हर करणार्या तमाम टी आर पी भुक्त पत्रकारांनो ...
जरा आजच्या लाल बावटा पुरस्कृत तथाकथीत शेतकरी मोर्चावर कव्हर स्टोरी बनवा .
नेत्यांच्या मुलाखती घेण्यापेक्षा सामान्य मोर्चेक्र्यांशी बोला ..
विचारा ..
कुठुन आलात ..?
( बरेचसे पालघर जिल्ह्यातील वाडा मोखाडा जव्हार , धुळे नंदुरबार येथील सातपुड्याच्या डोंगरातील आदिवासी पाड्यांवरुन आलेले असतील,)
मोर्चा नाशिक हुन निघालाय तेव्हा नाशिक परिसरातील खरीपाचे रब्बीचे ,बागायतदार शेतकरी कीती ..? हे पण तपासुन पहा )
विचारा ..
शेती कीती आहे .?
(शेती नाही ,लेबर कॉंट्रॅक्टर च्या मागे मीळेल ती मजुरी करणारे बहुसंख्य असतील ,ह्या पैकी काहीजण वनजमीनीवरील झाडे तोडुन नागली ,नाचणीचं मर्यादीत पिक घेतात . म्हणुन शेतकरी )
विचारा ..
कोणते पिक घेता .?
(नागली नाचणी )
कीती कर्ज घेतलं ...?
(आमाला कोणी कर्जच नाय द्येत )
विचारा ..
उदरनिर्वाहासाठी आणखी काय करता ..?
मुकादमाबरोबर मजुरीला जातो
लाल सलाम कधीपासुन आणि का करता ..?
(आमचा बाप आणि माय करायची तवापासुन ..)
विचारा ...
इथे येण्यासाठी कीती रुपये मीळाले ..?
(दोन वेळ जेवण आणि रोजचे दिडशे रुपये ,.)
विचारा ...
उन्हातान्हात एव्हढ चालुन त्रास नाही झाला ..?
उन्हातान्हात रणरणत्या डोंगरदर्यात वावरायची सवय हाय .
विचारा ...
मोर्चाला येवुन काय मिळणार ..?
(म्हायीत न्ह्याइ पण मुकादम म्हणतो की सरकार जंगलची जमीन नावावर करनार आनि म्हातारं झाल्यार पेन्सन बी देनार ..) आनि मोर्चात मुंबय पन बगायला मिलनार ..
ही आणि अशीच माहीती मिळते की नाही पहा ..
प्रत्यक्ष शेतकरी म्हणुन थेट संबंध नसलेल्या भोळ्या भाबड्या गरीब आदिवासींना शेतकरी मोर्चेकरी म्हणुन घासभर अन्न ,शे दोनशे रुपये आणि जमीन मिळवुन देण्याची खोटी आशा लावुन पाच सहा दिवस पायाला फोड येइपर्यंत उन्हातान्हात पायपीट करायला लावुन आपले राजकारण साधणे ही लालबावट्याच्या धुर्त नेतृत्वाने चालवलेली कृर पिळवणुकच आहे ..
वेगळ्याप्रकारची वेठबिगारीच आहे ..
हो आणि तुमचा कॅमेरा जरा खाली वळवुन मोर्चाचे नेतृत्व करणार्या त्या कॉमरेड सुरेश नवले आणि भालचंद्रा कांगोच्या पायाला फोड आलेत का ते तपासुन पहा ..
बोला पत्रकार ..?
करताय कव्हरस्टोरी ..?
करताय कम्युनिस्टाना एक्स्पोज ...?

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034