*लोका सांगे ब्रम्हज्ञान* *आणि आपण कोरडे पाषाण*-

*लोका सांगे ब्रम्हज्ञान*
*आणि आपण कोरडे पाषाण*-

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शिवतिर्थावर भाषण झाले त्याबद्दल " लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण कोरडे पाषाण ! " असेच त्यांचे झालेले दिसतेय असे म्हणावे लागेल. 
नुकताच मनसेचा १२वा वर्धापनदिन साजरा झाला तेव्हा जे बोलायचे ते पाडव्याला बोलीन तेव्हा सर्व महाराष्ट्रातून मनसैनिक या अशी त्यांनी साद घातली व त्या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून ते आले देखिल, सभेला चांगली गर्दी झाली होतीच नेहमी प्रमाणेच ! तेव्हा आदल्या दिवशीच मी १२ वर्षात पक्षकुठून कुठे आला याचे परीक्षण व तो परत मजबूत करण्यासाठी व योग्यदिशेने  नेण्यासाठी कार्यकर्त्यांना काही मार्गदर्शन, ठोस कार्यक्रम देतील असे वाटले पण ते बोलले भलतेच ! 
स्वतःच्या पक्षाचे १२ वर्षांतील प्रोग्रेस कार्ड तपासायच्या एवजी भाझापाच्या गुजरात विधानसभेचे विश्लेषण करत बसले ! हे अतिशय हास्यास्पदच वाटले. लोकसभेचे % पकडून आता भाजपाचे १६५ आमदार यायला पाहीजे तर ९९च आले म्हणजे मोदींना लोक कंटाळलेत व लोकप्रियता घटत चालली असे ढोल बडवायला लागले ! *पण सलग तिथे सतत सत्तावीस वर्षे पुन्हा भाजपा सत्तेत आलीए हे ते चक्क विसरले !संपुर्ण देशात एकच पक्ष ऐवढा वेळा एका राज्यात निवडून येणे हे  रेकाॕर्डच प्रस्थापित झाले आहे हे ते विसरले !* 
बरे स्वतःला जेमतेम महाराष्ट्रात एका शहरात सत्त मिळाली होती, नाशिकमध्ये ती ही टिकवता आलेली नाही, तिथे विकास केला म्हणून तुम्ही ढोल पिटलेत तरीही जनतेने तुम्हास नाकारले आहे तिथे ! घरील मैदानात मुंबईमध्ये तर २०० पैकी फक्त सात नगरसेवक निवडून आले त्यातीलही सहा सोडून गेले ! विधानसभेत सुद्धा सपशेल हार झालीच पण सर्वच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरीषदा अगदी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा पक्षाची खूपच पिछेहाट होऊन पक्षाचे अस्तित्वच कुठे दिसत नाहीये ! अशी पक्षाची भयावह परीस्थिती असताना, तुम्हाला साधी महापालिका चालवता आली नाही व मोदींना तुम्ही देश चालवायला येत नाही म्हणता यासारखा दुसरा मोठ्ठा विनोद नाही.
बारामतीच्या काकांचे सल्ले घेऊन मोदींना भ्रष्टाचारी म्हणता हा दुसरा विनोद ! 
आणि उगाचच त्या अक्षयकुमारला शिव्या घातल्यात त्याने सतत पंतप्रधान निधी, डिफेन्स निधी व शहीद सैनिकांच्या कुटूंबियांना लाखो, करोडोंचे डोनेशन दिलेय तुम्ही किती दिलेत ? बर तो बिचारा चांगले सामाजिक सिनेमे करुन लोकांचे प्रबोधन करतोय तर तुमच्या पोटात का दुखतय ? तो म्हणे माॕर्डन मनोजकुमार होतोय मग वाईट काय आहे त्यात ? 
 *उगच दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा स्वतःचे व पक्षाचे आत्मपरीषण करा, नाहीतर मोदीमुक्त भारत व्हायच्या ऐवजी विधानसभेत मनसेमुक्त महाराष्ट्र झालाच आहे पण महापालिका, नगरपालिका मनसेमुक्त व्हायच्या २०१९ मध्ये !*

 *एक मराठी माणूस* 
   🙏🏻

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034