शेतकरी मोर्चा यशस्वी?

शेतकरी मोर्चा यशस्वी? मागण्या मान्य?
काय होत्या मागण्या?
शेतमालाला योग्य दर मिळाला पाहिजे.
पाणी टंचाई वर तोडगा काढला पाहिजे.

शेतमालाला योग्य दर का मिळत नाही?
APMC च्या दलालांमुळे. जे रू.2/- प्रति किलो भावाने शेतकर्यांकडून माल विकत घेतात आणि शहरात रू 50/- प्रति किलो ने विकतात.
पाणी टंचाई का निर्माण होते?
कारण पाणी हे राजकीय पुढार्यांच्या द्राक्षाच्या मळ्यात आणि Wineries कडे वळवले जाते.
मोर्चात कोण सहभागी होते?
शेतकरी व आदिवासी.
मोर्चा कोणी आयोजित केला होता?
महाराष्ट्र कम्युनिस्ट पक्षाने..(CPI).
CPI कडे एवढा मोठा मोर्चा काढण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ आहे का?
उत्तर : नाही.
मग हे पाठबळ कोणी दिले?
हे पाठबळ दिले त्या राजकीय पक्षाने ज्याचा ताब्यात APMC आहेत व ज्यांच्या पुढार्यांच्या द्राक्षाच्या बागा व मळे आणि wineries आहेत ज्याच्या साठी तेथील पाणी वळवले जाते.
मग मोर्चा मुळे शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळाला काय? पाणी टंचाई वर तोडगा निघाला काय?
उत्तर: नाही....कारण?
कारण, सरकार शी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने ज्या ९ मुद्दयावर चर्चा केली त्यात वरील दोन मुद्दे नव्हतेच.
आदिवासी व गरीब शेतकरी यांना लिहिता वाचता येत नाही त्याचा (गैर ?) फायदा मोर्चा आयोजकांनी घेतला.
तरीही मग मोर्चा यशस्वी कसा?
कारण ज्यांनी मोर्चा ला आर्थिक पाठबळ दिले त्या राजकीय पक्षांनी 2001 - 2009 या काळात आपल्या dummy शेतकर्यांच्या नावाने घेतलेली सुमारे रू. 10,000 कोटीची कर्जे ही कर्ज माफी योजनेत सामील केली जातील असे आश्वासन सरकार कडून मिळवले.
त्याचबरोबर ज्यांच्या नावावर जमीन आहे अशाच शेतकर्यांची कर्जे माफ केली जातील - सरसकट नाही - या सरकार च्या भूमिकेला मोर्चा च्या आयोजकांनी दुजोरा दिली..
एकूण काय - मोर्चा आयोजकांनी व पाठबळ देणार्पयांनी ला स्वार्थ साधला.
एक कोटी रुपये खर्च करून दहा हजार कोटी रुपये पदरात पाडून घेतले.
आणि गरीब शेतकरी व आदिवासी ज्यांनी एवढी पायपीट केली त्यांना मिळाला बाबाजी चा ठूल्लू आणि पायांना छाले व वेदना..

Comments