थोडी घेतली की बर वाटतं

थोडी घेतली की बर वाटतं

ताण तणावात अस्वस्थ वाटल्यावर
कामाच्या धाकधुकीत थकवा आल्यावर
निवांत क्षणी एकटेपणा जाणवल्यावर
आणि जेव्हा जुन्या आठवणीत मन गुंतत
तेव्हा थोडीशी घेतली की जरा बर वाटतं

कधी बायकोशी खटके उडाल्यावर
कधी बायकोच्याच प्रेमात पडल्यावर
तर कधी बायकोला येडं बनवल्यावर
पण जेव्हा तिला यातलं सगळं खरं कळतं
तेव्हा थोडीशी घेतली की जरा बर वाटतं

कधी जुनी मैत्रीण अचानक दिसल्यावर
तिने पाहूनही मुद्दाम काना डोळा केल्यावर
त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यावर
जेव्हा तिच्या आठवणींत उगाच मन झुरतं
तेव्हा थोडीशी घेतली की जरा बर वाटतं

कधी मैफिलीत मित्रांच्या मैत्रिखातर
कधी सग्या- सोयऱ्यांच्या आग्रहाखातर
कधी उगाच सेलिब्रेशनच्या नावाखातर
जेव्हा चार चौघांचं सहज मन धरलं जातं
तेव्हा थोडीशी घेतली की जरा बर वाटतं

कधी जीवनात थोडं नैराश्य आल्यावर
कधी जीवनात थोडं यश मिळाल्यावर
कधी रोजपेक्षा वेगळं जगावं वाटल्यावर
जेव्हा कुठं निवांत जाऊन बसावं वाटतं
तेव्हा थोडीशी घेतली की जरा बर वाटतं

घेणाऱ्याने घेत जावी देणाऱ्याने देत जावी
घेणाऱ्याने मात्र रोज आवश्यक तेवढीच घ्यावी
अन घ्यावी अशी की  बायकोलाही न कळावी
जेव्हा जेव्हा घेतली की तिचं टाळकं फिरतं
तेव्हा थोडीशी घेतली की जरा बर वाटतं...!

मित्रांनो....
मी "डुलकी" (वामकुक्षी) बद्दल बोलतोय....! 😜
उगाच गैरसमज करुन घेऊ नका...!
🙏

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained