२०१८ वर्ष धोक्याचे आहे.

२०१८ वर्ष धोक्याचे आहे.

२०१८ मध्ये देशातील सर्व राष्ट्रवादी - म्हणजे nationalist - विचारांच्या लोकांनी सतर्क राहायला हवे.
हे वर्ष म्हणजे २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांचे ' सेमी फायनल ' वर्ष आहे. यावर्षी ८ राज्यांतल्या विधानसभा निवडणुका आहेत.
या पार्श्वभूमीवर ४ वर्षांपूर्वी निवडणुकीत पराभूत झालेले जातीवादी पक्ष या वर्षात जातीवादाचे विष देशात पसरवून लोकांमध्ये तेढ निर्माण करून नरेंद्र मोदी यांना कात्रीत पकडण्याचा डाव खेळणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.
हिंदू विरुद्ध दलित, हिंदू विरुद्ध मुसलमान अशा दंगली घडवून आणायच्या, आरक्षणासाठी महाराष्ट्रात मराठा, गुजरात मध्ये पाटीदार, राजस्थानात मीना, हरियाणात जाट अशा विविध समाजांना भडकवायचे, मिडिया आणि डाव्या विचारसरणीच्या गाळसाळांना हाताशी धरुन छोट्या छोट्या गोष्टींचा बागूलबुवा करायचा, GST, आधार कार्ड लिंक करणे, परकीय गुंतवणूक याविषयी थोतांड पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून कसेही करून कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील निवडणुका जिंकायच्या व २०१९ पूर्वी मोदी विरोधी वातावरण तयार करायचे हा मास्टर प्लॅन आहे.
आणि यासाठीच कांग्रेस ने गुजरात मध्ये वापरलेले जातीवादी अस्त्र संपूर्ण देशात पसरवण्याची व्यूहरचना आखली आहे.
जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, कन्हैया कुमार, उमर खालिद, प्रकाश आंबेडकर हे सर्व या व्यूहरचनेतील प्यादी असणार आहेत.
आपला मास्टर प्लान तडीस नेण्यासाठी प्रसंगी PFI, SIMI, काश्मीर फुटीरतावादी, माओवादी नक्षलवादी अशा लोकांची मदत घ्यायला राहूल गांधी कचरणार नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे.
कांग्रेस च्या रडारवर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व कर्नाटक ही राज्ये आहेत.
या राज्यात एकूण १६८ लोकसभा मतदारसंघ आहेत.
२०१४ मध्ये भाजपाने या १६८ पैकी १४४ जागा जिंकल्या होत्या.
कांग्रेस च्या गणितात २०१९ मध्ये त्यांना येथे चांगले यश मिळू शकते.
गुजरात मध्ये दुही माजवलीच आहे, आता कांग्रेस ची नजर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड वर आहे.
राजस्थानातील मीना आणि जाट समाजामध्ये खदखदणार्या असंतोषाला खत पाणी घालायचे, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना भडकवायचे, छत्तीसगड मध्ये माओवादींना उखसवायचे, महाराष्ट्रात मराठा व दलित आणि कर्नाटकात लिंगायत अशांना हाताशी धरून हैदोस घालायचा असा प्रयत्न कांग्रेस चा असेल.
राहूल गांधी सत्तेसाठी कुठच्या ही थराला जाऊ शकतात.
गुजरात मध्ये त्यांनी निवडणूकीपूर्वी अशक्यप्राय अशी दोन आश्वासने जनतेला दिली. एक म्हणजे पाटीदारांना आरक्षण - जे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषांनुसार शक्य नाही - आणि दुसरे म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्ज माफी - जी सुद्धा गुजरात ची अर्थ व्यवस्था पाहता शक्य नाही.
यापुढे राहूल गांधी राजस्थानात आर‌क्षण देण्याची, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्याची, कर्नाटकात लिंगायतस वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली तर आश्चर्य वाटायला नको.
गुजरात मध्ये नाही का त्यांनी आपण जानवेधारी ब्राह्मण असल्याचा 'गौप्यस्फोट' केला.
यामध्ये आपण नेमके काय करायचे?
हा प्रश्न लोकांना पडू शकतो.
मी सुरूवातीला म्हटल्या प्रमाणे आपण सर्वांनी सतर्कता बाळगली पाहिजे.
मोदी प्रेमी आणि भाजपा धार्जिण्या सर्व लोकांनी कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर डाव्या विचारसरणीच्या गाळसाळांचा हा डाव असफल करण्यासाठी कंबर कसली पाहिजे.
मोदी आहेत ना, अमित शहा आहेत ना - ते बघून घेतील असे गृहीत धरले तर घात होईल. गुजरात होईल.
भाजप नेते, पक्षाचे पदाधिकारी यांच्याबद्दल कोणाच्या मनात कितीही राग असला तरी मोदींसाठी, देशासाठी आपण आपल्या भावना आवरल्या पाहिजेत.
सोशल मीडिया, नेटवर्किंग साईट्सवरून, वन टू वन संभाषणातून आपण लोकांना कांग्रेस च्या कुटील कारस्थानाची माहिती दिली पाहिजे.
विरोधी पक्ष दलित समाजाला खोट्या गोष्टी सांगून भडकवणार. आपण आपल्या परीने खरी माहिती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे.
वैयक्तिक गाठी भेटी, ई-मेल, ट्विटर असं जमेल त्या पद्धतीने पक्षाच्या नेत्यांना ground reality ची खरी खरी माहिती दिली पाहिजे.
ते ऐकतील की नाही, वाचतील की नाही याची चिंता करू नका.
माझ्या मते, कोणी जाहीर पणे न मानो, पण गुजरात ने एक जबरदस्त Wake up Call पक्षाला दिला आहे.
तेथील जनतेने राहूल गांधी ना अंशत: का होईना स्विकारून धडा दिला आहे की Elections are all about getting the vote mathematics right.
भाजपाचे गणित नीट ठेवण्यासाठी, मोदींच्या साठी सर्वांनी पुन्हा २०१४ चा समर आठवून कामाला लागले पाहिजे.
© दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained