वास्तव भीमा कोरेगावचे ....
या विषयावर प्रकाश पाडण्याचा उद्देश इतकाच आहे की तिसऱ्या *इंग्रज - मराठा* (भिमा कोरेगाव ) या युद्धाचा दाखला देऊन *उमर खालिद* सारखे देशद्रोही दलितांना उच्च वर्णीयांविरुध्द भडकावत आहेत आणि इंग्रजांना मदत केली म्हणून उच्चवर्णीय दलितांना *गद्दार* ठरवत आहेत .
५०० महार सैनिकांनी २८००० मराठा सैनिकांचा पराभव केला .
या वर काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट वाचली आणि असंख्य प्रश्नही निर्माण झbाले ते खालीलप्रमाणे .
१) जर ५०० सैनिक २८००० हजार सैन्याचा पराभव करतात आणि ते ही ब्रिटिशांच्या उपस्थितीत तर याची नोंद जागतीक पटलावर का नाही ?
२) फक्तं ५०० सैनिक २८००० हजार सैनिकांचा पराभव कसा करू शकतात ? कारण भिमा कोरेगाव हा नदीकाठचा सपाट प्रदेश आहे इथे एकही खिंड , दरी , जंगल किंवा किल्ला नाही युद्ध झालं तर समोरा समोरच होणार मग अशा परिस्थितीत फक्तं ५०० सैनिक २८००० सैनिक निशस्त्र असले तरी त्यांचा पराभव करू शकत नाहीत .
३) या युद्धात त्या पाचशेपैकी एकही सैनिक शहीद झाल्याची नोंद का नाही ? युद्ध कितीहि छोटं असलं तरी त्यात शहीद असतात इथे विरुद्ध २८००० होते .
४) ब्रिटिश सैन्यात प्रशिक्षीत सैनिक असायचे आणि तेच युद्ध लढायचे अशा परिस्थितीत जनरल स्टोटनसारखा अनुभवी अधिकारी ५०० नवख्या महार सैनिकांच्या भरवशावर २८००० फौजेशी युद्ध करायला जाईल का ?
५) या युद्धात इंग्रजांकडून ५०० महार सैनिक लढले आणि त्यांनी मराठा सैन्याचा पराभव केला असा उल्लेख आहे .मग काही ठिकाणी ८०० ते ९०० ब्रिटिश सैनिक शहीद झाले यांच्या नोंदी आढळतात .याचा अर्थ युद्धात ब्रिटिश सैन्यही होते पण ते किती होते याचा कुठे उल्लेख का नाही ?
मित्रांनो हेच सत्य जाणून घेण्यासाठी मी इतिहासाची पान चाळायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं हे युद्ध पेशवाई संपवायला पुरेसं होत त्यामुळे पेशवाई बखरींमधे या युद्धाचा उल्लेख नाही .अनेक ठिकाणी इंग्रजानी लिहलेला इतिहास दिसतो .फार खोलात जाऊन माहिती काढल्यानंतर ही माहिती माझ्या समोर आली .
दुसरा बाजीराव पेशवा गादीवर आल्यापासून पेशवाईला उतरती कळा सुरू झाली .
तिसरे *इंग्रज मराठा युद्ध* हे दुसऱ्या बाजीरावाने ब्रिटिशांच्या वसाहतीवर हल्ला केल्यावर सुरू झालं .पुण्यात पेशवे नाहीत या संधींचा फायदा घेऊन जनरल स्मिथने चाळीस हजार सैन्यानिशी पुण्यावर हल्ला चढवला आणि शनिवार वाड्यावर इंग्रजांचा ध्वज फडकला .पेशवे साताऱ्याहूंन पुणे वाचवायला निघाले तेव्हा त्यांच्या सैन्याचा तळ पुण्यापासून पूर्वेला भिमा नदीच्या काठी पडला या वेळी जनरल स्टोटन ३०००० ब्रिटिश सैन्यानिशी तिथे येऊन पोचला या सैन्यात कॅप्टन एफ .एफ .स्टॉनन याच्या नेतृत्वा खाली सेकंड बॉंबे इँफ्रँट्री बटालियन होती आणि यात ५०० महार सैनिक होते .
हे युद्ध २८००० मराठे विरुद्ध ५०० महार असं नसून २८००० हिंदुस्थानी मराठा सैनिकविरुद्ध ३०००० हजार ब्रिटिश सैनिक असं होत .ज्यात २४०० मराठे तर ८०० ते ९०० ब्रिटिश सैनिक शहीद झाले .
*आता तुम्हाला असा प्रश्न पडेल हा इतिहास कोणी आणि का बदलला ?*
जेव्हा फोडा आणि राज्य करा ही युद्धनीती ईंग्रजांनी सुरू केली तेव्हा उच्चवर्णीय विरुद्ध कनिष्टवर्णीय हा भेद वाढवण्यासाठी हा इतिहास बनवला जो कधी अस्तित्वातच नव्हता .
*मी या देशाचा एक नागरिक आहे ज्याला लोकशाही आणि संविधान याचा आदर आहे .ऐकीव इतिहासावरून आपआपसात भांडून रक्त सांडू नका .सत्याची कास धरा भविष्याकडे प्रयाण करा .*
Comments
Post a Comment