माझ्या दलित मित्रांना व इतर समाजातील तरूणांना कळकळीचे आवाहन:2

माझ्या दलित मित्रांना व इतर समाजातील तरूणांना कळकळीचे आवाहन:
माझ्या भावांनो आणि भगिनींनो,
नमस्कार.
भीमा कोरेगाव प्रकरण घडून २०० वर्षे झाली. जे तेव्हा घडले त्यावरून आता मांडण्यात काय अर्थ आहे?
जरा विचार करा की तुमच्या so called नेते मंडळींनी आज पर्यंत तुम्हाला काय दिले?
त्यांचा चिथवण्यावर तुम्ही भांडता, लढता, आंदोलन करता, स्वत: च्या अंगावर केसेस घेता. आपल्या आयुष्याची राखरांगोळी करता.
तुमचे नेते गडगंज श्रीमंत झालेत आणि तुम्ही अजून फक्त भांडत आहात.
ते महागड्या गाड्यातून फिरतात आणि तुम्ही मात्र मित्रांच्या बाईक वर.
ते झाले करोड पती आणि तुम्ही अजून रोड पती - रस्त्यावर.
बाबासाहेबांनी आपल्या काय शिकावले आहे ते लक्षात ठेवा : वाचाल तर वाचाल.
बाबासाहेबांनी कधीच हिंसाचार शिकवला नाही.
बाबासाहेबांनी कधीच दुसऱ्या समाजाविरुद्ध द्वेष करायला सांगितले नाही.
तुमचे आजचे फडतूस नेते तुम्हाला चुकीच्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या नेत्यांना केवळ तुमच्या जीवावर स्वत:ला गडगंज संपत्ती जमवायची आहे.
अशा फालतू नेत्यांना गाडून टाका.
अशा नेत्यांनी बंगले बांधले आहेत जेव्हा तुम्हाला साध घर ही नशीब नाही.
आणि तुम्ही समाधानी आहात की हे तुमच्या झोपड्यांना protection देतात.
हे नेते तुम्हाला दुसऱ्या समाजाविरुद्ध व दुसऱ्या पक्षांविरूद्ध लढवतात पण स्वत: मात्र इतर पक्षांतील नेत्यांशी छुपी मैत्री, छुपे धंदे करत असतात.
हे फडतूस नेते बाबासाहेबांनी दिलेल्या आदर्शा विरूद्ध काम करतात.
तेव्हा जागे व्हा. केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या आदर्शा चे पालन करा.
शिका. मोठे व्हा. आपल्या समाजाला योग्य दिशा तुम्ही द्या..
फडतूस नेत्यांना गाडून टाका.
बना तुम्ही नव्या भारताचे नेते.
दयानंद नेने
ॲलर्ट सिटीझन्स फोरम

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034