नवीन भारत आणि मोदी :

नवीन भारत आणि मोदी :
रोज पेपर वाचतो आणि त्याच नित्याच्या विषण्ण करणाऱ्या बातम्या
पहिली बातमी चीन कसा भारताला नामोहरम करतोय
दुसरी आपण चीन पेक्षा कसे कमकुवत आहोत
तिसरी अच्छे दिन का नाही आले
चोथी काँग्रेस कसे चांगले होते आणि
मोदी ने कसे चुकीचे निर्णय घेतले किंवा मोदी कसा चुकीचा आहे
हा देश राहण्यासाठी कसा अयोग्य आहे आणि आपला देश कसा रसातळाला जात आहे
तसे तर बरेच मुद्दे आहेत पण मी सुरवात मी सुरवात करेन डेमॉनेटायझेशन पासून :
एक हि फक्त छोटी ऍक्शन होती आणि सम्पूर्ण अर्थ क्रांती प्रक्रिया अजूनही कार्यान्वित झाली नाही . मूळ हेतू होता कि देशातील नकली नोटा साफ करायच्या आणि याचा ब्लॅक मनीशी अगदी थोडासा सम्बद्ध आहे. आधी नकली नोटा ( counterfeit currency) आणि काळा पैसा ( Black Money ) काय ते जाणून घेऊया.
नकली नोटा : हे काम १०० % तुमच्या शत्रू देशाचं असते आणि जो पर्यंत आपले लोक पैशाच्या व्यवहार चेक ने करतात ही ( counterfeit currency ) वापरातच येत नाही . पण आपल्या देशात व्यापाऱ्यांना counterfeit currency वापरता आली आणि तेही मोठ्या प्रमाणात.
ब्लॅक मनी : सरकारला पारदर्शकता न ठेवून जेव्हा टॅक्स बुडवण्यात येतो तेव्हा त्या कमाईला ब्लॅक मनी म्हणतात .
आज चीन एवढा पुढे गेला आहे कि जगातला सर्वात मोठा सुपर कॉम्पुटर त्यांच्या कडे आहे आणि तेही सम्पुर्णपणे त्यांच्या देशात बनवलेल्या पार्टस वर ( चिप सर्व्हर्स ऑपरेटिंग सिस्टिम ) आता त्यांच्यासाठी नकली नोटा ( counterfeit currency ) बनवणे आता अगदी हाताचा मळ आहे. हेच नकली नोटा बनवणं २० वर्ष आधी फार कठीण काम होते . आज ५०० ची न जी १९८७ साली आली ती बनवायला खर्च येतो ३रुपए ४० पैसे आणि १००० ची न जी बाजारात अली २००३ साली तिचा खर्च येतो ३ रुपये ६० पैसे . २००० च्या नोटला ३ रुपये ८० पैसे . एवढा कमी खर्च करून जर शत्रू राष्ट्राला झोपवता येत असेल तर कोणीही त्याची जय्यत तयारी ठेवेल. जगातील जवळ जवळ सर्व देशांनी निर्णय घेतला आहे कॅशलेस currency चा. कारण चीन हा अतिशय महत्वाकांक्षी देश आहे आणि त्याची भूक आता आशिया खंडाच्या पलीकडे गेली आहे आणि स्वतःचा दबदबा वाढवण्यासाठी तो काही करू शकतो .
आज हा निर्णय घेतला नसता तर १० वर्षांनी आपल्या देशाची अवस्था एकदम बिकट झाली असती. १९९१-९२ आठवून पहा तेव्हा देशाची काय अवस्था झाली होती ते आठवून बघा . आपल्या सरकार कडे देश चालवायला पैसाच राहिला नाही .अरब देशाकडून साधं पेट्रोल आणायला पैसे नव्हते . पण मनमोहन नावाच्या जादूगाराने देश वाचविला . मी कधीच त्यांचे क्रेडिट घेणार नाही शेवटी एक महान इकॉनॉमिस्ट आहे तो माणूस . असो . नकली नोटा हे शत्रू कारस्थान असते आणि त्याने ते तुमची अर्थव्यवस्था समूळ उध्वस्त करू शकतात . शहाण्या माणसाने बँकेतून व्यवहार केले तर तर तो या काउंटर फिट ( counterfeit currency ) च्या भवऱ्यातून वाचतो . पण आपल्या कडे टॅक्स बुडवण्यात धन्यता आणि यश मानणाऱ्या व्यापारी लॉबीला लॉबी ला हे कळलं असत तर काय मग हि वेळ आलीच नसती . असो , मोदी ला स्वतःला माहित होते कि याचे परिणाम किती गम्भीर असतील त्याच्या स्वतःच्या पार्टीच्या लोकांची किती गच्छन्ति होईल पण धाडस दाखवून हा निर्णय घेतला गेलाच . आज असलेली ५.० .टक्के विकास दर निदान खरा आहे . कितीतरी लोक आज वरमून टॅक्स भरायला लागले आहेत यात पंतप्रधान मोदीची चूक काय. त्यांनी तेच केले जे जरुरी होते . फक्त जनतेला आवडणारे निर्णय घेणारा नेता देशाला कुठेतरी हानी घडवतो असे पाहण्यात आले आहे .
पंतप्रधान म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असला तरी देशात intelligence bureau नावाची मोठी गुप्त सक्षम संस्था असते तिच्या अनुमती शिवाय असला मोठा निर्णय घेतला जाऊ शकत नाही . अश्या निर्णयात आधी SWOT Analysis केले जाते. Strengh weakness Opportunity आणि Threat . या विषयी गुप्त गम्भीर चर्चा करून नन्तर हा निर्णय घ्यायचा असतो . या बद्दल लिहिण्या सारखे खूप आहे पण वर्तमान पत्रांनी आधीच आपले जजमेंट दिले आहे कि डेमॉनेटायझेशन हे सम्पुर्णपणे फसले आहे आणि वंचित गोष्ट अशी कि सामान्य लोक तर सोडाच शिकलेले लोकही यावर चटकन विश्वास ठेवतात .
बरेच सामान्य लोक तर राहुल गांधीला सुद्धा इकॉनॉमिस्ट मानतात . या वर्तमान पत्रांनी कधीच अनिल बोकील यांची माहिती दिली नाही किंवा हे सुद्धा जरुरी समजले नाही कि नक्की किती नकली नोटा व्यवहारातून बाद झाल्या . पण youtube वर अनिल बोकील यांची सविस्तर मुलाखत आहे आणि अगदी सध्या सोप्या शब्दात त्यांनी हि प्रक्रिया समजावून सांगितली आहे. बरचसे बिल्डर सुमारे २००८ पासून प्रचन्ड प्रमाणात काळा पैसे कॅश स्वरूपात दाबून बसले होते . त्याना पुन्हा रियल इस्टेट चे वर अस्मानाला न्यायचे होते. वर्षानुवर्षे चालत आलेली पद्धत त्यांना अनुसरायची होती . काम थांबवा म्हणजे किमती वाढतील मग हवा तसा अफाट नफा कमवा . माझ्या समोर वसईला ४ लाखाचे घर ४० लेखाला विकलेले पहिले मी. यामुळे इतर उद्योग धंधे गडबडतात .
तर या व्यापाऱ्यांनी त्यानी हा पैसा काही पुन्हा मार्केट मधेय गुंतविला नाही आणि आज त्या पैश्याची रद्दी झाली.याच मूळ कारण म्हणजे याच्या कडे दडवून ठेवलेल्या पैश्यात किती नकली नोटा होत्या आणि किती असली नोटा होत्या याची त्यांना स्वतःला कल्पना नव्हती . आता नकली नोटा तर बँक घेणार नाही आणि तो पैसे पूर्ण बुडाला आणि असली नोटांवर टॅक्स . आधीच शिस्तीत बँक च्या माध्यमातून व्यवहार केले असते तर हि वेळ आलीच नसती .
बिल्डिंग व्यवसायात लेबर ला पेसा कॅश द्यावा लागतो आणि तिथे खरी संधी प्राप्त होते टॅक्स बुडवण्याची १००० च्या ठिकाणी १० मजूर दाखवा आणि १० मजुराच्या मिळकतीवर टॅक्स दाखवा . याचे खरे वांधे झाले आहेत . " अवघड जागी दुखणं आणि जावई वैद्य " म्हणतात ते हेच.
आता येतो वर्तमानपत्रांकडे ,
अतिशय दुःखाची पण खरी गोष्ट कि आज सगळी वर्तमानपत्र विकली गेलेली आहेत. चीन किंवा सौदी च्या ताब्यात यांच्या चाव्या आहेत . ते जे बोलतात तेच हे लिहितात .मोदी सत्तेत येऊ नये म्हणून यांनी अकांड तांडव केले होते . अगदी अमेरिकेच्या राष्ट्र अध्यक्षांना पत्र लिहून सांगितले.
रोज वाचताना हे भारतबद्दल फक्त आणि फक्त वाईटच लिहितात. जगात २२८ देश आहेत आणि जर नीट पहिले तर पहिल्या १० देशात आपण नक्कीच येतो मग निकष कुठलेही लावा ( अगदी रॉकेट टेकनॉलॉजि पासून तो ग्रामीण उदयोग पर्यंत ) आणि ७० वर्ष आधी आपण कुठेच नव्हतो अगदी लोखंड बनवण्याची coal furnace टेकनॉलॉजि पण नव्हती तिथून मंगळयांन यशस्वी केले . भारत शिवाय कुठल्याही देशाने मंगल यान पहिल्या प्रयत्नांत यशस्वी केले नाही . २०० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लडला कधीच मागे टाकले. आता तर त्यांचे पंत प्रधान बाई येतात रोज आपल्या देशात काम धन्दा द्या म्हणून .कोणी उभं पण करत नाही त्यांना .
नवीन गोष्टी घडतायत जगात भारताचं नाव हे लोकांना माहित आहे . भारतात घराघरात TV CELLPHONE internet पोचलंय. मग हे सगळं झालाय ते आपोआप झालाय का ?
पण रोज या वर्तमानपत्रांना फक्त राज ठाकरे , उद्धव ठाकरे , भुजबळ, पवार , फडणवीस हेच का दिसतात . याना नवीन होणारे प्रोजेक्ट का दिसत नाहीत
याना देशात नवीन पिढी चमत्कार घडवते आहे हे का छापता येत नाही .
किती जणांना माहित आहे OYO / HIKE या नव्या अँप्स बद्धल . OYO बनवणारा फक्त २३ वर्षांचा कोवळा मुलगा आहे आणि एकहाती त्याने ६०० करोड चा बिझिनेस सुरु केला आहे तेही कुठल्याही मदती शिवाय. पण आमच्या वर्तमान पत्रांना हे दिसत नाही REDBUS हि ७०० करोड ची अँप्स बनवणारे तिघे फणींद्र साम, सुधाकर पुसूंपुनेरी , चरण पदमराजू हैद्राबाद चे पण कोणालाच माहित नाही . P सिंधु चीन मध्ये जाऊन चिनी जमिनीवर त्यांच्याच जगातल्या नम्बर १ ला हरवून आली पण कोणी छापत नाही . फक्त तेंडुलकर दिसतो बाकीचे कुचकामी का ?
कारण देशाभिमान वाटावा अशी कुठलीही गोष्ट छापणे हे याच्या नीती विरुद्ध आहे . या गोष्टी अजिबात छापून येत नाही असे नाही कुठल्याच्या कोपऱ्यात अगदी जुजबी माहिती देऊन उपकार केल्यासारखे छापतात . याच वर्तमानपत्रांनि जरा या अति श्रीमंत नेत्यांच्या income tax स्टेटमेंट बद्दल छापुन दाखवावे मग मानतो कि त्यांना . हि असते असली पत्रकारिता , झाकलेल्या मुठी उघडण्याची आणि सत्य जगासमोर आणण्याची . इमान विकलेल्या पत्रकाराकडून काय अपेक्षा ठेवावी आणि कशी ठेवावी .
परवाच " THe Hindu " मध्ये भली मोठी हेडलाईन होती " डेमॉनेटायझेशन आणि GST मुळे देशात दुर्दशा आली " - इति राहुल गांधी . प्रचंड मोठी हेडलाईन. मला सांगा कि राहुल गांधी काही कोणी इकॉनॉमिक्सचा प्रकांड पंडित नव्हे मग त्याला महत्व का द्यायचे ? बर तो बरळला असेल काहीतरी म्हणून देशातल्या सर्व वर्तमानपत्रांनि त्याला हेडलाईन का बनवावे ( केवळ तो काँग्रेसचा लीडर म्हणून ). काँग्रेस मध्ये शिकलेला सावरलेला कोणी लाल बहाद्दूर शास्त्री राहिला नाही का कोणी फक्त गांधी परिवाराचं राहिला आहे . कितीजणांना माहित आहे GST हा १५८ देशात यशस्वी टॅक्सिन्ग सिस्टिम आहे आणि म्हणून तो भारतात आणला गेला . GST च्या अंलबजावणीसाठी काँग्रेसचीपण मंजुरी घ्यावी लागली होती. मोदींनी सोनिया आणि इतर काँगेसजन यांच्या बरोबर मिटिंग घेतली होती . कारण लोकशाहीत ८० % मत आवश्यक असतात असल्या मोठया निर्णयाला.
दुसरे , रिचर्ड थेलर माहित आहे का कोणाला . बहुदा नाही . डेमोनेटीझशन चा मूळ जनक ज्याला आज नोबेल मिळाले त्याने मोदीला १०० गुण दिले
This is a policy I have long supported. First step toward cashless and good start on reducing corruption. "
डेमॉनेटायझेशन बद्दल. आता त्याचा या गुणांशी कुठलाही स्वार्थ सम्बन्ध नव्हता. पण त्याच्या बद्दल लिहिणे म्हणजे महापाप. विद्वान असला तरी काय झाले मोदीच्या निर्णयाला योग्य निर्णय म्हणतो म्हणजे म्हणजे मूर्खच. असेल मोठा इकॉनॉमिस्ट तिकडचा . युरोपियन समुदाय एखादी गोष्ट पटली कि लगेच अमलात आणतो . उ.दा. योगासने आज युरोप आणि अमेरिकेत जास्त केली जातात. मग ते तिथे धर्म किंवा देश बघत नाहीत . या एकमेव गोष्टीत मला ते आपल्या पुढचे वाटतात . रिचर्ड थेलर च ऐकून, त्यांनीही कॅशलेस करन्सी ची अमलबजावणी सुरु केली आहे मग आपण मागे का रहावे.जवळ जवळ १० वर्षात सगळे पुढारलेले देश कॅशलेस होतील.
एक काळ असा होता कि लोक बोलताना वर्तमान पत्रांचा दाखला द्यायचे कि बघ पेपर मध्ये छापून आलंय. आताशा अशी वेळ अली आहे कि मी गेली ७ वर्ष वर्तमानपत्र घेणं बंद केलं आहे . ऑफिस मध्ये फक्त वरच्या बातम्या एकदा वाचतो आणि योग्य तो अर्थ लावायचा प्रयत्न करतो . बाकीचे न्यान व्हाट्सअँपवर फुकट मिळते
चीन बद्धल :
अफाट महत्वाकांशा तीही एवढी अफाट कि मांणस मेली तरी चालेल पण पैसा प्रचन्ड वाढला पाहिजे . भारतापेक्षा जास्त लोकं या देशात आत्महत्या करतात खास करून फॅक्टरी वर्कर्स . कारण रोज १२ तास काम , ६ दिवस आणि ७ व्या दिवशी काम केलं तर दुप्पट पगार . वर्कर्सची घर फॅक्टरी च्या आतमध्ये म्हणजे येण्या जाण्याचा वेळ आणि खर्च वाचला . फॅक्टरी च्या बाहेर जीवन नाहीच . थोडक्यात गुलामी पण नवीन प्रकारची . लोकशाही तर याना माहित पण नाही .
चीन आज जगात ६४ देशांना OBOR या प्रोजेक्ट ने जोडतोय या सर्व देशात रस्ते , रेल्वे आणि वीज बनवण्याची तजवीज चीन करणार . त्यासाठी आवश्यक ती टेकनॉलॉजि आणि सामुग्री चीन देणार .युगांडा कॉंगो रवांडा बुरुंडी सुदान इथिओपिया मध्ये तर रस्ता पण नाही तिथे चक्क रेल्वे येणार . दिसायला किती विलोभनीय दिसतंय आणि असं वाटतंय कि चीन या देशांची किती मदत करतोय. पण यासाठी कर्ज देणारी चीनची चायना डेव्हलपमेंट बँक हि ८ टक्के व्याज लावतेय . अगदी वर्ल्ड बँक सुद्धा जास्तीस्त जास्त फक्त ३ टक्के दराने व्याज देते . जर देश गरीब असेल तर १ टक्क्याने . आज हे देश ना विचार करता कर्ज घेत आहेत. याच्यातलाच एक देश आहे पाकिस्तान जवळ जवळ ७० बिलियन डॉलरचा CPEC प्रोजेक्ट . सुरवातीला पाकिस्तानात सर्व वर्तमानपत्र आणि अर्थतद्न्य फक्त अत्यानंदाने नाचायचे बाकी होते. हा प्रोजेक्ट सम्पेल २०३० साली .चीनने यासाठी लावला व्याजदर ८ % . जेव्हा त्यांना कळले की खरा जागतिक व्याजदर ३ % असतो त्यांना फेफरे यायचे बाकी राहिले . सरकारने हि गोष्ट लोकांपासून लपवून ठेवली आणि आता ते निर्णयावरून माघारी जाऊ शकत नाहीत
दुसरं, पाकिस्तानात सुद्धा मेट्रो ट्रेन आहे इस्लामाबाद मध्ये २४ किलोमीटरची अर्थात चीन ने बनवलेली फक्त एवढेच कि त्या ट्रेनच्या सात पट पैसे देऊन पण पाकिस्तान कर्ज मुक्त झालेले नाही .जे कोणी उत्सुक असतील त्यांनी विकी पेडिया वर हि लिंक वाचावी .
https://en.wikipedia.org/wiki/Rawalpindi-Islamabad_Metrobus एवढे प्रचंड अव्वा च्या सव्वा भाव जगात कोणी लावले नसतील . तरी बरं आपल्यासाठी हि चांगली गोष्ट आहे . चीनने असेच कर्ज द्यावे आणि पाकिस्तान कर्जात कायमचा बुडावा . सुंठीवाचून खोकला जाणे बोलतात ते हेच .
आज जपान आपल्याला फक्त ०.१ टक्के दराने कर्ज आणि टेकनॉलॉजि दोन्ही देऊन गेला हि गोष्ट त्यांना अतिशय झोबली आहे . मी भारताच्या बातम्या नित्य नियमित पाकिस्तान न्यूज चॅनल वर बघत असतो युट्युब वर फुकट आहे सगळं. माझा देशाभिमान खऱ्या अर्थाने तिथे जागृत होतो . एक वेगळी मौज असते जेव्हा शत्रू राष्ट तुमच्या देशाच्या प्रगती बद्दल तीळमिळीने बोल्त असते . सहज म्हणून करून बघा युट्युब वर. एक काळ असा होता कि आपला संघ नित्य नियमित हरत असे . १९९०-९९ साल आठवा , आपण म्हणायचो कि अक्रम सारखा बॉलर नाही आपल्या क्रिकेट टीम मध्ये. आज पाकिस्तान अगदी तसेच बोलताना दिसतो मोदी सारखा पंत प्रधान नाही त्यांच्याकडे .
थोडक्यात चीन हा सर्व आफ्रिकी देशांना प्रचन्ड कर्ज देत सुटलाय आणि त्यांना हि परतफेड कारायची कशी ते पण ये देशांना माहित नाही . जिथे बँक नाहीत कुठलेही इन्फ्रास्ट्रक्टर नाही तिथे कसे आणि काय कर्जफेड करणार हे लोक.
१० वर्षांत अशी वेळ येईल कि या सर्व देशांना चीनला देण्यसासाठी पैसे नसतील . उ.दा. श्रीलंकेत चीनने एक मोठा हंबनटोटा नावाचा पोर्ट बनवला ३६१ मिलियन डॉलर्स चा केवळ व्यापारी उद्धेशासाठी आणि कालावधीने त्यांच्या वॉर शिप उभ्या केल्या . भारताने आक्षेप घेतला आणि श्रीलंकेला शेवटी चीनला आदेश द्यावे लागले कि या वॉर शिप्स तुम्ही इथे ठेवू शकत नाही.आज श्रीलंकेकडे या पोर्ट चे कर्ज चुकवायला पैसे नाहीत आणि ते भारताला सांगत आहेत कि तुम्ही हा पोर्ट विकत घ्या . बोला आता काय करायचे.
NEW AGE OF EMPERIALISM : नवीन प्रकारचा वसाहतवाद . आधी जे ब्रिटिश करत होते तेच पण आता अव्वाच्या सव्वा दराने कर्ज देऊन कायमचे वेठ बिगारी बनवणे हे चीनचे नवीन धोरण आहे आणि याच्या जमिनीवर आणि खाणीवर कब्जा मिळवणे.
आपले भारतीय वर्तमानपत्र ह्या बातम्या का छापत नाहीत ( इंग्लिश आणि देशी दोन्ही ). या बातम्या CNN , BBC , NEWSWEEK अश्या ठिकाणीच का येतात . नक्की कोण थांबवतं आपल्या वर्तमानपत्राना ?
आपल्या वर्तमानपत्राना काँग्रेस मध्ये फक्त राहुल गांधी का दिसतो दुसरं का कोणी दिसत नाही . मला तरी कळत नाही पण हि पार्टी आता देश चालविण्याच्या लायकीची नाही हे मात्र नक्की ते बऱ्याचशा गोष्टी ज्या चांगल्या घडत आहेत ते बिघडवून टाकतील हे नक्की.
बरेचसे असेही म्हणतील मोदी हा रिलायंस आणि अडानिचा खास माणूस आहे . तस तर टाटाचा हि मोदी खास माणूस आहेच कि . आज टाटाला १००० करोड च डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट मिळालं . कारण काँग्रेस टेट्रा ट्रक ( १० कोटींचा १ ट्रक ) आर्मी साठी बाहेरून आणत होते, पण आता ते टाटा बनवतो .
आज देशात ७० % जनता हि अशिक्षित आहे .इलेक्शन आलं कि पैसे घेऊन वोट देणे हे त्यांचे काम.
मग माझा असा प्रश्न , अशा अवस्थेत अशी कुठली अशी पार्टी आहे जी कुठल्याही सपोर्ट शिवाय करप्शन शिवाय इलेक्शन जिंकू शकते . माझ्या मते कुठलीच नाही किमान निदान पुढच्या २५ वर्षापर्यंत कुठलीही पार्टी पेसा ओतल्याशिवाय शिवाय जिंकू शकणार नाही . भारतात इलेक्शन जिंकायला प्रचंड पेसा लागतो आणि त्या नंतरच तुम्ही पंतप्रधान बनू शकता. मोदी ने ते केलं तर वावगं काय निदान देशासाठी प्रचंड मेहनत घेतोय ते बघा. हेच काँग्रेस साठी DLF ने केलं .
DLF ने काही दान धर्म म्हणून तर काँग्रेस ला मदत केली नव्हती तोच हिशेब . देशच असा आहे त्याला मोदी किंवा मी किंवा तुम्ही काय करणार. एका सुधृढ लोकशाहीला मूळ धरायला खूप वेळ लागतो .
आजही देशात १ लाख कोटीची वीज चोरीला जाते मग मला सांगा त्या वीज चोरणाऱ्याला हक्क आहे का कहा गये वो अच्छे दिन विचारण्याचा ? माझा ऑफिस चा टॅक्सी ड्राइवर सांगतो गावात जाऊन तो फक्त खासदाराच्या ऑफिसात कर्जाचे फोर्म भरतो आणि ५ एकर वर ५ लाखाचे कर्ज मिळते वषांखेरी ते माफ होते ३० % आणि ७० % चा हिशोब . अश्या लोकांना बोलायचा हक्क आहे का कहा गये वो अच्छे दिन ? अश्या लोकांना शिक्षा करून पण आपण सिस्टिम सुधारू शकत नाही कारण त्यामुळे चांगलं होणं तर दूर पण वाईट जास्त होईल.
काही लोक मोदीला चायवाला म्हणतात , मी एकच प्रश्न विचारतो मोदींच कुठलंही भाषण एका तो कितीतरी अश्या गोष्टी सांगतो त्या तुम्ही ऐकलेल्या पण नसतात. देशाबद्दल आणि इतिहासाबद्दल एवढी माहिती असेलेला नेहरू नन्तर हाच नेता इतर कोणी नाही. चायवाला असला म्हणून तो विद्वान नाही असे कसे शक्य होईल.
गुजरातला वरच्या पातळीवर नेंण हे काही साधे सोपे नव्हते पण ते करून दाखवले म्हणून तर त्याला वरती आणला गेलं तेही पक्षात एवढी मोठी चढ ओढ असताना. खरं बोलायचे तर एवढं प्रचंड General Knoweldge असलेला नेता मी पहिला नाही आणि मला स्वतःला सुद्धा माहित नाही
"हे काम नव्हे येऱ्या गबाळ्याचे तेथे पाहिजे जातीचे " म्हणतात ते हेच
नवीन भारत घडतोय आणि तो काही वेडावाकडा आंही तर शिस्त बद्ध प्रक्रियेत वाढतोय आणि हि काही फोफावून सांगितलेली वाढ नाही खरी वाढ आहे .
नवीन तरुण मुलं रोज नव्या चांगल्या बातम्या आणत आहेत. आज इसरो स्वतः पैसे कमवायला लागला आहे .
*अमेरिका आता आपल्याला तेल विकतोय तेही OPEC पेक्षा कमी भावात. २ जहाज ४० दिवसांचा प्रवास करून आली सुद्धा हल्दिया आणि पारादीप च्या बंदरात .
* २०२४ पर्यंत आपल्या वीज गरजेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण असू .त्यानन्तर आपली ऑइल इम्पोर्ट एकदम घटेल .
* फास्ट ब्रीडिंग रिऍक्टर रशिया फक्त आपल्याला दयायला तयार झाला आणि १० रिऍक्टर काम चालू झाल आहे . जगात इतर कोणाकडेच हे रिऍक्टर नाहीत. २ रिऍक्टर वर्किंग आहेत.
* ४-G MIMO टेकनॉलॉजि अंमलबजावणी सुरु झालीय आहे .
*क्ल्पसार हा प्रोजेक्ट नाव सुद्धा बऱ्याच जणांना माहित नसणार हा २० नद्यांना एका धरणात अडवणारा महाकाय प्रोजेक्ट आहे . हे चीन पेक्षा हि मोठं धरण असेल जेव्हा पूर्ण होईल .
* भारतमाला हा दुसरा महाकाय प्रोजेक्ट २०२२ पर्यंत पूर्ण होईल.
* अमेरिका आज आपल्याला EMP GUN दयायला तयार झाला ( डोकोलम चा फायदा भारताने उचलला ) . कुठल्याही मिसाईलला आणि शत्रूच्या विमानाला हवेतच सम्पवणे मग ते कितीही मोठे असो , तेही एका फटक्यात , हे या EMP GUN ने सहज शक्य आहे आणि हे शस्र काही प्रचंड महाग वा अवाढव्य नाही. पण टेकनॉलॉजि खूपच कॉम्प्लेक्स आहे . खरं वाटणार नाही या घडीला, पण आपलं लष्कर हे चीन पेक्षा जास्त सुसज्ज आणि शक्तिमान आहे तंत्रन्यान आणि मनुष्यबळ दोन्ही बाबतीत .
* जगात भारत हा एकमेव देश आहे जिथे अमेरिका आणि रशिया दोघे मदत करताना मागे पाहत नाहीत . जिथे इस्रायल आणि अरब राज्य दोन्ही व्यापार करतात. चीनला शह देण्यासाठी भारतापेक्षा मोठा मित्र नाही हे जगाने मान्य केलं आहे .
विश्वास ठेवा देश घडत आहे. प्रत्येक देशात विघातक असतात आज ते काम वृत्तपत्रे / काही पत्रकार करत आहेत त्यांना ठेव थोडं बाजूला आणि बघा देश कसा नटतोय.
शेवटी कुठलाही पंतप्रधान मग तो मनमोहन असो व मोदी अच्छे दिन तीत पर्यंत अनु शकत नाही जो पर्यंत जनता साथ देत नाही .
बाकी कोणी काही म्हणा आपण मोदी वर खुश आहोत .
FWD..

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained