*नोटबंदीला एक वर्ष; नोटबंदीचे परिणाम काय?*_

*नोटबंदीला एक वर्ष; नोटबंदीचे परिणाम काय?*_ 




*नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. भारताच्या इतिहासात 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस कोरला गेला. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा एका रात्रीतून चलनातून काढून घेतल्यानंतर त्याचे अनेक बरे-वाईट परिणामही दिसले. मात्र, हा निर्णय दीर्घकालीन फायद्याचाच असल्याचे हळूहळू समोर येत आहे. नोटाबंदी आणि त्यानंतर वर्षभरातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा आज आम्ही घेणार आहोत...

_*कशासाठी घेतला गेला हा निर्णय?*_

देशात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा निर्माण होत असून, त्यामुळे समांतर अर्थव्यवस्था फोफावू लागली आहे. हा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 500 व 1000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा चलनातून बाद केल्या गेल्या होत्या. काळ्या पैशाचे निर्मूलन, रोखरहित अर्थव्यवस्था, दहशतवादाला आळा आदी उद्देश यामागे असल्याचे सांगितले गेले.



 _*काळा पैसा बाहेर आला का?*_

नोटबंदीला एक वर्षपूर्ण झाले तरी असले तरी या कालावधीत काळा पैसा किती बाहेर आला हे तपासणे किंवा जाणून घेणे महत्वाचे ठरते. मात्र, गेल्यावर्षभरात किती काळा पैसा बाहेर आला याची ठोस आकडेवारी कुठेही उपलब्ध नाही. काहींच्या मते काळा पैसा बाहेर आणण्यासाठी केलेली नोटबंदी अयशस्वी झाली तर काहींच्या मते मोठ्याप्रमाणात काळा पैसा बाहेर आला.

 _*रोखरहित अर्थव्यवस्थेला प्रतिसाद मिळाला का?*_

अर्थ मंत्रालयाच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, सप्टेंबरदरम्यान 1.24 लाख कोटी रुपयांचे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स झाले आहेत. रोजच्या कामांमध्येही डिजिटल व्यवहार पाहायला मिळाला. लोकांनी debit card, m-wallet, IMPS, PayTm अशा डिजिटल सेवांचा लाभ मिळवत डिजिटल देवाण-घेवाण केली आहे. मात्र ग्रामीण भाग, शेतकरी किंवा छोटे व्यापारी यांच्यापर्यंत कॅशलेस मोहीम पोहचली नाही किंवा याबतची साक्षरता झाली नाही. 

_*दहशतवादाला आळा बसला का?*_

नोटाबंदीला लागू करण्यादरम्यान असेही म्हटले गेले होते की, दहशतवाद आणि नक्षली हालचालींवर अंकुश बसेल. परंतु एका वर्षानंतरही या हालचालींवर नोटाबंदीमुळे अंकुश लागल्याची सबळ माहिती समोर आलेली नाही. काश्मिरात दहशतवादी कारवायांत वाढ झाली आहे. तथापि, नक्षली हालचाली कमी झाल्याचे आढळले आहे.

_*विकासदरावर काय परिणाम?*_

नोटाबंदीच्या घोषणेनंतर पहिल्या तिमाहीत जीडीपी दर घटून 6.1 वर आला. मागच्या वर्षी यादरम्यान हा 7.9 टक्क्यांवर होता. यानंतर एप्रिल-जून तिमाहीत विकासदर आणखी कमी झाला. आणि तो 5.7वर पोहोचला. मागच्यावर्षी याचदरम्यान तो 7.1 टक्क्यांवर होता. तथापि विकासदर घटण्यामागे नोटाबंदीच कारणीभूत आहे का हे अजून स्पष्ट नाही.

 _*नोटाबंदीचे फायदे-तोटे काय?*_

नोटाबंदीचे फायदे-तोटे इतक्या झटपट मोजता येणारे नाहीत. मात्र सव्वादोन लाख बोगस कंपन्या त्यामुळे पकडल्या गेल्या व काळ्या पैशाचे व्यवहार थोपवण्याचे मोठे पाऊल उचलले गेले. हे अन्य कुठल्याही मार्गाने शक्य झाले नसते. चार लाख कोटी इतकी रक्‍कम बँकांच्या खात्यांत सक्‍तीने जमा झाली आणि त्यामुळे अशा बोगस कंपन्या व त्यांचे व्यवहार उघड होऊ शकले.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained