Dr Peg's Advise... *सेफ ड्रिंकिंग कसे असावे.....*

Dr Peg's Advise...
*सेफ ड्रिंकिंग कसे असावे.....*
मद्य व केवळ पाणी यांचे मिश्रण सर्वोत्तम. कारण मद्याने शरीरारील पाण्याचे प्रमाण कमी होते. ते सोबतच्या पाण्याने भरून निघते.
मद्य व सोडा यांचे मिश्रण त्यातील कार्बन-डाय-ऑक्साईड मुळे जठरात चांगले शोषले जाते. तसेच सोडा हा फक्त पाणी व कार्बन-डाय-ऑक्साईडचे मिश्रण असल्याने पोटातील अॅसिडिटीची पातळी वाढत नाही.
उपाशी पोटी 60ml चा एक पेग (ज्याला large पेग म्हणतात) ग्लासात घेऊन त्यात 150ml वा अधिक पाणी/सोडा घालून तयार झालेलं मिश्रण अगदी हळूहळू घोटघोट घेण्याने अपेक्षित नशा मद्याच्या थोड्याशाच मात्रेने येऊ शकते. त्यासोबत एखादा तळलेला पापड वगैरे असेल तर त्याने वर सांगितल्याप्रमाणे जठराचे स्नायूंचे दरवाजे बंद होऊन मद्याचे शोषण त्वरित होऊ लागते.
मद्य फळांच्या रसाबरोबर घेण्याने शरीराला आवश्यक पाणी व चोथा दोन्ही मिळतात. तसेच त्यातील शर्करा रक्तातील साखरेची कमी होणारी पातळीही थोडीफार नियंत्रणात ठेवते.
मद्याचे शोषण होण्यासाठी त्याला चयापचय प्रक्रियेची फारशी गरज नसते. पण ते रक्तप्रवाहात मिसळून त्याचा मेंदूवर परिणाम होण्यासाठी काही वेळ जाणे आवश्यक असते. पण या मधल्या काळात नशा येत नाहीसे पाहून अधिकाधिक मद्यपान केले जाते. हे नक्कीच टाळावे.
कमी उजेडात केलेले मद्यपान अधिक परिणामकारक ठरते. म्हणूनच घरच्या मद्यपानापेक्षा बार मधील अत्यंत कमी प्रकाशात केलेले मद्यपान अधिक परिणाम करते. याला कारण आपल्या मेंदूत नियमित अंतराने स्त्रवणारे मेलॅटोनिन हे संप्रेरक होय. आपल्याला झोप येण्यास हेच कारणीभूत असते. जेटलॅगचे कारणही याचेच संतुलन बिघडणे होय.
मद्यप्राशनानंतर व्यवस्थित चौरस जेवणे अगदी महत्वाचे असते. कारण मद्याने रक्तातील आवश्यक घटक कमी होऊन nutritional deficiencies यायची शक्यता असते.
महत्वाचे : 1 पेग = 60 ml हार्ड ड्रिंक = 150 ml वाईन = 400 ml बिअर. यात प्रत्येकी अंदाजे 18g पर्यंत अल्कोहोल असते. त्याने रक्तातील अल्कोहोलची पातळी 25 mg/dl इतकी होते.
अत्यंत महत्वाचे : कोणी कितीही आग्रह केला, काहीही म्हणाले, चिडवले, हिणवले, काहीही झाले तरी दोन पेग पेक्षा अधिक मात्रेत कधीही मद्यपान करू नये.
स्त्रियांसाठी या मर्यादा अजूनही काहीशा खालच्या पातळीवर आहेत.
कोणत्याही कारणांसाठी काही औषधोपचार चालू असल्यास आपल्या डॉक्टरना विचारल्याशिवाय मद्यपान करू नये. काही औषधे व मद्य यांचा एकत्रित परिणाम शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो.
एखादी व्यक्ती "टाकी" आहे, ती व्यक्ती खंबा रीचाविते पण जराही परिणाम होत नाही.... वगैरे पोकळ गोष्टी आहेत. हा तद्दन मूर्खपणा आहे. याना कधीही आदर्श मानू नये.
महाग मद्य उच्च प्रतीचे असते वगैरे मार्केटींगचा भाग आहे.
मद्यपानानंतर मेंदूची विचारक्षमता अंधुक होते. अंतराचा अंदाज चुकतो. नजर धूसर होऊ शकते. CNS म्हणजे मध्यावर्ती चेतासंस्थेला आलेल्या ग्लानिमुळे स्नायूंवर नियंत्रण रहात नाही. परिणामी तोल सांभाळता येत नाही. यामुळेच मद्यपानानंतर स्वत:स कितीही OK वाटत असले तरी पोहणे, ड्रायव्हिंग, तसेच मशिनरीवर काम इत्यादी कधीही करू नये.
शेवटी, दारू दारू आहे. जर वरील नियमांचे पालन करून व वरील मर्यादेत राहून मद्यपान केल्यास आनंद प्राप्तीसोबत शरीराची नाहक हानीही होणार नाही, अशी आशा करुया.
*दारू मुळे वजन वाढू नये यासाठी 5 टिप्स्*
1. दारूमधे कोल्ड्रिंक मिक्स करू नका त्यातली शुगर घातक असते
2. चाकणा म्हणून बटाटा वेफर्स खाऊ नका. बटाटा पिष्टमय असतो
3. पापड घ्याल तर रोस्टेडच घ्या, तळलेल्याचे तेल वजन वाढवते
4. बॉईल्ड अंडी घेतलीत तर वर मीठ पेरू नका. मीठानेही वजन वाढते.
😊
*सल्ला आवडला तर बसतांना बोलवा*
🍻🍷🍸🍾
जनहिता साठी.

Comments