*शून्य बजेट नैसर्गिक शेती (Zero Budget Natural Farming) चे जनक* *- पद्मश्री सुभाष पाळेकर (अमरावती)*

*शून्य बजेट नैसर्गिक शेती (Zero Budget Natural Farming) चे जनक*
 *- पद्मश्री सुभाष पाळेकर (अमरावती)*
झिरो बजेट नॅचरल फार्मिंग - ही पद्धत अथक प्रयत्नातून बनवली आहे प्रयोगशील शेतकरी सुभाषजी यांनी.
 कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य कसा आणायचा याची ही वैज्ञानिक पद्धत
 कोणतीच गोष्ट विकत घेऊन शेतात वापरायची नाही हे तत्व, त्यामुळे शेतकरी कर्जमुक्त राहतो
 ४० लाखाहून अधिक शेतकरी आज ह्या पद्धतीने यशस्वी शेती करत आहेत
 शेतीत सिंचन असेल किंवा कोरडवाहू असेल; कोणीही ही पद्धत वापरू शकता
🌳🍒🍊आपण जंगलात गेलो तर आपल्याला फळांनी लगडलेली, अवाढव्य वाढलेली झाडे दिसतात. त्यांना निसर्गच वाढवतो. ह्या झाडांमध्ये कधीच नत्र, पोटॅश इत्यादींची कमी सापडणार नाही.
👉​​​ त्यांना वरून खते पण द्यावी लागत नाहीत (कृषी विद्यापीठांचे दावेही खोटे ठरतात)
जंगलात
- मशागत नाही
- रासायनिक खत नाही
- शेणखत नाही
- कंपोस्ट नाही
- कीटक नाशकांची फवारणी नाही
- सिंचन नाही
तरीही मुबलक आणि एक्स्पोर्ट क्वालिटी फळे येतात
दुष्काळात चिंचेला जास्त चिंचा लागतात
 *म्हणजेच निसर्गाची स्वतःची स्वयंपूर्ण व्यवस्था आहे* - मग आपण ती का शिकवत नाही ?
🏭💉 कारण कृषी विद्यापीठात रासायनिक शेतीवर भर दिला जातो.
👉​​​ रासायनिक शेती म्हणजे कंपनीने बनवलेली बियाणे आणि त्यांनीच बनवलेली रासायनिक खते वापरून केली जाणारी शेती
👹 *रासायनिक खतांचा सापळा*
🔺 चमत्कार दाखवून नमस्कार मिळवले रासायनिक शेतीने! कारण पहिली काही वर्षे भरगोस उत्पादन येते; एकदम दुप्पट किंवा तिप्पट उत्पादन येत.
🔺 ह्या लॉटरीला शेतकरी बळी पडतो
🔺 रासायनिक शेतीसाठी संकरित बियाणे विकत घ्यावे लागते व रासायनिक खातेही विकत घ्यावी लागतात
🔺 पण रासायनिक खते जमिनीतील उपयोगी जिवाणू नष्ट करतात
🔺 ७ ते १० वर्षांनंतर रसायनांमुळे जमिनीचा पोत संपतोच
🔺 आणि मग कितीही जास्त रासायनिक खत घाला उत्पादन घटतच जाते
 *रासायनिक शेतीचे चक्रव्यूह समजावून घेऊया*
रासायनिक शेतीसाठी
💵 संकरित बियाणे विकत घ्या (कारण इथे देशी बियाणे चालत नाही)
💵 रासायनिक खते विकत घ्या (कारण ह्या खतांशिवाय वाढीव उत्पादन मिळत नाही)
💵 रासायनिक कीटकनाशके विकत घ्या (कारण रासायनिक खतामुळे जमिनीची प्रतिकार शक्ती घटते, व कमजोर पिकाला कीड लागते)
💵 ट्रॅक्टर विकत घ्या (कारण रसायनांच्या अनेकदा वापराने जमीन सिमेंट सारखी कडक व्हायला लागते, भुसभुशीत रहात नाही )
🤕 परिणामतः *शेती सुरू करतानाच शेतकऱ्याला खूप पैसा खर्च करावा लागतो*
🔺 हाताशी पैसा नसेल तर *कर्ज* काढावे लागते
🔺 शेतकरी चक्रव्यूहात फसायला लागतो आणि ही सगळी संपत्ती परदेशी कंपन्यांकडे जायला लागते
👹 *लूट करणे हीच पाश्चात्य व्यवस्था आहे.*
👳​​​​💰 हरित क्रांतीने शेतकऱ्याला परावलंबी बनवले आणि देशालाही गुलाम बनवले
🔺 एकरामागे १०,००० रु परदेशात जातात, हे अरबो रुपये गावात राहिले असते तर गावाचा विकास झाला असता
🔺 ग्राम स्वावलंबन, ग्राम स्वराज्य ही भारताची हजारो वर्षाची परंपरा ब्रिटिशांनी नष्ट केली
*कसा लागला झिरो बजेट नॅचरल फार्मिंग (ZBNF) चा शोध ?*
👉​​​ पाळेकरांनीही BSc ऍग्री पद्वी अभ्यास पूर्ण केल्यावर १९७३ ते १९८५ सालात १२ वर्षे *रासायनिक शेती* केली, त्यात भरपूर उत्पादन वाढत होते.
*पण १२ वर्षांनंतर शेतात उत्पादन एकदम कमी व्हायला लागले.*
🔺 खते वाढवून, संकरित बियाणं लावूनही काही फायदा होत नव्हता
 म्हणजेच हरितक्रांतीच्या तत्वज्ञानात आणि तंत्रात काही खोट आहे हे त्यांच्या लक्षात आले
👉​​​ शिकत असताना पाळेकर *आदिवासीं* बरोबर राहिले होते, त्यांनी परत जंगलात जाऊन अभ्यास करायचे ठरवले
👉​​​ *२ वर्ष जंगलात राहून त्यांनी जंगलाच्या ५ पदरी व्यवस्था (five layer system) चा अभ्यास केला*
🌿 झाडांखाली पडलेल्या पानाचा अभ्यास केला
🌿 त्याच्या खालच्या जिवाणू, बुरशीचा अभ्यास केला
🌿 ह्या अभ्यासाचे प्रयोग शेतात केले
पाळेकरांचे हे प्रयोग धाडसी होते आणि सामान्यांच्या समजे पलीकडचे होते
🔺 ह्या प्रयोगांमुळे मित्र, नातेवाईक, समाज त्यांना वेडा ठरवायला लागला, त्यांच्यावर अघोषित बहिष्कार पडला
👉​​​ पण पाळेकरांची बायको त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहिली, तिने खर्चासाठी स्वतःचे दागिनेही गहाण ठेवले
 *१९८८ ते २००० सालात तब्बल १२ वर्ष प्रयोगांच्या तपश्चर्येनंतर पाळेकरांना उत्तरे मिळाली*
🌿 कुठेही जायची गरज नाही, जमिनी मध्येच सगळं आहे, निसर्गातच सगळं आहे हे त्यांना उमगले
*शेतकरी आत्महत्येची कोणती कारणे नाहीत*
🔺 सिंचन आभाव हे कारण नाही आत्महत्येचे
- पंजाब मध्ये ९८% सिंचन आहे, पण तिकडे सगळ्यात जास्त आत्महत्या होतात
- अल्मटीडाम येथे प्रचंड पाणी आणि ऊस शेती आहे, पण तरीही आत्महत्या होतात
- १९७२ च्या आधी सिंचन व्यवस्था नव्हती, आपली शेती ही कोरडवाहू शेती होती - तरीही आत्महत्या होत नव्हत्या
🔺 मानसोपचारांच्या अभावाने आत्महत्या होत नाहीयेत
🔺 दारू पिऊन आत्महत्या वाढत नाहीयेत
🔺 मागास राज्यात आत्महत्या नाहीत - जिथे तथाकथित विकास आहे तिथे आत्महत्या जास्त होताना दिसत आहेत असे का ?
 *शेतकरी आत्महत्येची खरी महत्वाची कारणे:*
🔺 सतत कर्ज बाजारीपणा वाढणे: कारण रासायनिक शेती व्यवस्थेने प्रत्येक वस्तू विकत घेणे बाध्य केले आहे
 त्यात गारपीट, अवेळी पाऊस ह्याने ते पीक नष्ट झाले
📉 किंवा बाजारात योग्य भाव मिळाला नाही
💰 कर्ज घेऊन शेती केल्याने शेतकऱ्याचे कर्ज वाढतच गेले
😨 त्यात मुलींचे लग्न (हुंडा, गावजेवण अश्या अनिष्ट प्रथा), मुलांचे शिक्षण आहे त्यासाठी अधिक कर्ज
🔺 हव्यासापायी जिथे पूर्ण सिंचन नाही तेथे उसासारखी पिके (ज्यांना जास्त पाणी लागते ती) पेरल्याने नुकसान होणे
🔺 यात हफ्ते चुकल्याने अचानक होणारी बँकांची जप्ती
🤕 ह्या सर्वांमुळे स्वाभिमानानी जगणारा शेतकरी खचून जातोय आणि आत्महत्या करतोय
😇 *झिरो बजेट फार्मिंगने हे चित्र बदलते:*
झिरो बजेट फार्मिंग मध्ये काहीच विकत घ्यायचे नाही आहे
 त्यामुळे कर्जाचा प्रश्नच नाही
 त्यामुळे आत्महत्या नाहीच नाही
🌽 शेतकरी *देशी बियाणे* वापरतो व बियाणे स्वतः *साठवतो* पुढच्या पिकासाठी
🐮 *एक देशी गाय* (विदेशी जर्सी नाही हे लक्षात घ्या) गरजेची आहे. तिच्यापासून मिळणारे शेण व मूत्र शेतात वापरले जाते.
 *४० ते ५० लाख शेतकरी* आज झिरो बजेट पद्धतीने शेती करत आहेत
- एकानेही आत्महत्या केलेली नाही
🐂 *मातीचा पोत वाढवण्यासाठी सर्वात चांगले जिवाणू कोणते ?*
🔹 भारतीय संस्कृती विषयी फार भ्रामक कल्पना विदेशी माध्यमांनी पसरवल्या आहेत
🔹 गोपूजन करणारा आपला शेतकरी वेडा नाहीये
🔹 देशी गायीचे (विदेशी जर्सी गाय नव्हे) शेण व मूत्र शेत जमिनीसाठी सर्वोत्तम आहे
🤔 *वैज्ञानिक दृष्टिकोन:*
🔹 भारतीय गायीच्या ३६ जाती आहेत, त्यांचे *शेण-मूत्र* पाळेकरांनी *प्रयोग शाळेत तपासून घेतले.*
🔹त्याबरोबरच तुलनेसाठी बैल, म्हैस तसेच विदेशी जर्सी गाय यांचेही नमुने तपासले.
🔹मेंढी बकरीच्या लेंड्या तपासल्या, उंटाची लेंडी तपासली.
 ह्यानंतर असे लक्षात आले की *अनंतकोटी जिवाणूंचे खरे विरजण असेल ते देशी गायीचे शेण-मूत्र आहे*. 🐮
🔹 १ ग्रॅम शेणात ३०० कोटी पेक्षा जास्त उपयुक्त जिवाणू आढळले.
🔺 म्हशीच्या शेणात तर हे चांगले गुणधर्म नाहीतच.
🔺 विदेशी जर्सीमध्ये ७० लाखावर ही संख्या मिळाली नाही; तसेच त्यात घातक असे पॅथोजेन / विषाणू जास्त होते.
 प्रयोग म्हणून हर एक पद्धतीचे शेण शेतात वापरून पाहिले.
 देशी गायीच्या शेणाचा सर्वात जास्त चांगला परिणाम शेती उत्पादनावर दिसून आला.
👉​​​ आपल्या वाड-वडिलांना हे महत्व मांडता आले नाही.
🔹 परदेशातून आलं ते ज्ञान आणि भारतात आहे ते अज्ञान ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.
🔹 आपल्या परंपरांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
🐮 *१ देशी गाय* असेल तर *३० एकर* शेती करू शकता (सिंचित / असिंचित, कोणतंही पीक)
🔹 १ एकरासाठी देशी गायीचे फक्त १० किलो शेण लागते तेही महिन्यातून एकदा.
🔹 देशी गाय दिवसाला ११ किलो शेण देते.
- म्हणजे १ गायीपासून ३० एकर शेतीस पुरेल एवढे शेण महिन्याला मिळते.
🔹 *पाळेकरांकडे पिकांचे आराखडे उभे आहेत. काहीही पिकवा.*
🔹४० ते ५० लाख शेतकरी ते यशस्वीपणे वापरात आहेत.
- ऊस करा
- फळबागा करा
- भात करा
 झिरो-बजेट-शेतीमध्ये देशी बियाणे संकरित बियाणांपेक्षा जास्त उत्पादन देते.
उदाहरण:
१. 🌾 बासमती तांदळाच्या पिकाला ट्रक ट्रॅक्टरने खत टाका - एकरला १२ क्विंटल पलीकडे उत्पादन देणार नाही. हीच त्याची मर्यादा आहे.
- तोच बासमती झिरो-बजेट शेतीमध्ये १८ ते २४ क्विंटल एकरी उत्पादन देतो.
२. 🌾 देशी बन्सी गहू - १ एकराला रासायनिक खताने ६ क्विंटल उत्पादन देतो
- झिरो-बजेटमध्ये १ एकरला १८ क्विंटल उत्पादन देतो
३. 🎋ऊस - झिरो-बजेट मध्ये १०० टन उभा आहे,
- रासायनिकला ४० टनच्यावर जात नाही
 झिरो-बजेटमध्ये कीड / बुरशी लागत नाही
१. 🍅 डाळिंब - झिरो-बजेटमध्ये तेल्या होत नाही आणि नासाडी होत नाही
२. 🍇 द्राक्षावर - झिरो-बजेटमध्ये मिली बग, डाउनी मिल्ड्यू रोग नाही
३. 🍊 संत्रा मोसंबीवर - झिरो-बजेटमध्ये डिंक्या (फायटोप्थोरा बुरशी) नाही
🌿 *माणसाच्या निसर्गाला पर्याय शोधण्याच्या अट्टाहासात विकासाची दिशाच चुकली*
- आपण निसर्गाकडे जातो तेव्हा संस्कृतीची निर्मिती होते
- जेव्हा निसर्गापासून दूर जातो तेव्हा विकृतीची निर्मिती होते
🙏 श्री सुभाष पाळेकरजी भारतभर गावोगावी जाऊन ह्या शेतीचा प्रचार करत आहेत
👉​​​ ते कोणतेही मानधन स्वीकारत नाहीत
👉​​​ हिमाचल प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, दक्षिण भारत इत्यादी ठिकाणी असंख्य शिबिरे त्यांनी घेतली आहेत
🇮🇳 *२०१६ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सम्मानित केले आहे*

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034