*मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाड येथील सावित्री नदीवरील पुलाचे उद्घाटन झाले.*

*मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याहस्ते  महाड येथील सावित्री नदीवरील पुलाचे उद्घाटन झाले.*
*35.77 कोटी रूपये खर्च* करून अतिशय विक्रमी वेळात या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री श्री अनंत गिते, राज्यातील मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील, श्री प्रकाश मेहता, श्री प्रवीण पोटे, श्री रवींद्र चव्हाण, श्री रामदास कदम यावेळी उपस्थित होते.
सुमारे 4000 कोटींच्या विविध विकास कामांचे यावेळी भूमिपूजन सुद्धा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित नेत्यांच्या हस्ते करण्यात आले.
महाड ते रायगड किल्ल्याला जाणार्‍या रस्त्याचे दुपदरीकरण, हा रस्ता राजमाता जिजाऊ समाधी, चित्त दरवाजा आणि पुढे हिरकणीवाडीपर्यंत आहे. याशिवाय, अंबडवे-पाच्रळ-मंडणगड-राजेवाडी या मार्गाचे सुद्धा दुपदरीकरण केले जात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील चौपदरीकरणाच्या रायगड जिल्ह्यातील 3 पॅकेजचे भूमिपूजन सुद्धा यावेळी करण्यात आले. यात इंदापूर ते वडपाले (24.430 कि.मी/1202 कोटी), वीर ते भोगाव खुर्द (39.5 कि.मी/1598 कोटी) आणि भोगाव खुर्द ते कशेडी घाट (13.6 कि.मी/1011 कोटी) यांचा समावेश आहे. आजच्या कामांचे वैशिष्ट्य म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावांतील रस्त्याचा यात समावेश असून, रायगडाला जोडणार्‍या रस्त्याचाही समावेश आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, *जी कामे गेल्या 60 वर्षांत झाली नाही, ती या 3 वर्षांत हाती घेण्यात आली आहेत, अतिशय गतीने आम्ही कामे करतो आहोत. कोकणचा विकासाचा मार्ग हा रस्त्यांनीच उघडणार आहे.*
2018 पर्यंत मोठ्या प्रमाणात कोकणाला रस्ते प्राप्त होणार आहेत.

Comments