*_आता आम्ही जगावे तरी कसे?_*
जेमतेम तीन वर्षांपूर्वी तुम्ही सत्तेवर आलात, सर्वात आधी गॅस अनुदानित दरात न देता ती सबसिडी थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केलीत. ठीक आहे आमचा त्या घोटाळ्यात जास्त शेअर नव्हता तर त्यामुळे आम्हाला जास्त झळ बसणार नव्हती आम्ही शांत राहिलो.
तुम्ही खताचे वाटप सुद्धा फक्त शेतकऱ्यांनाच केले अन अनुदान पण थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. आता आम्ही परिश्रमपूर्वक एवढा मोठा काळाबाजार तयार केला तो युरिया कारखान्यांना विकून अन त्यावरची मलई खाऊन, तुम्ही शेतकऱ्यांनाच अनुदान देताय म्हणल्यावर आमची तर उपासमार होऊ लागली. पण तरीसुद्धा आम्ही (नाईलाजाने) शांतच राहिलो.
पण आता नोटाबंदीच्या काळात आमचे जे प्रचंड नुकसान झालंय ते अंशतः का होईना आम्ही कर्जमाफीच्या रूपाने वसूल करू इच्छितो तर तुम्ही त्यालाही तयार नाहीय.
आम्ही सुद्धा वेळोवेळी कर्जमाफी केलीच ना (अन त्यात गबर आम्हीच झालो कारण शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यावर किती बोजा चढवलाय हे माहीतच नसायचं)
आम्ही सुद्धा वेळोवेळी कर्जमाफी केलीच ना (अन त्यात गबर आम्हीच झालो कारण शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यावर किती बोजा चढवलाय हे माहीतच नसायचं)
तुम्ही मागील दोन वर्षात सिंचन योजनांची काटेकोर अंमलबजावणी केलीत अन आमची टँकर लॉबीची पण वाट लावली. आता आम्ही एवढे पैसे घालून (खाऊन) टँकर घेतले ते काय दारात उभे करायला काय?
असे आमचे बरेच उद्योग आहेत पण तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी चाप लावत चाललाय
बर तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करावे तर ते सिद्ध पण होत नाहीयेत (आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार).
आम्ही गेल्या 67 वर्षात जी सरंजामशाहीची घडी घातलीय तीच तुम्ही पार विस्कटून टाकताय?
अन ह्या वेगाने तुम्ही जर सुधारणा कराल तर आम्हाला पुढच्या निवडणुकीत कोण विचारणार (तस पण आत्तातरी कोण विचारतय म्हणा)
असं एवढं वाईट तर आपण शत्रूच सुद्धा चिंतीत नाही तुम्ही पण जगा अन आम्हाला पण जगवा असं असावं ना. पण आम्हाला जगवायची सोय तुम्ही छगनरावांसारखी कराल तर ते कसं बरं मान्य व्हावं?
म्हणून आम्हाला आता हे शेतकरी संपाचे पाऊल उचलणं भाग पडलंय. (कारण आम्हाला हे तर माहीतच आहे की संपात मेला तर शेतकरीच मरणार आहे आम्हाला काय त्याचे आम्हाला तर तो भांडवलंच देणार आहे तमाशे करायला)
*_आता तरी सांगा ना की आता आम्ही जगावे तरी कसे?_*
- आपला एक अडगळीत पडलेला राजकारणी
Comments
Post a Comment