शेतकर्‍यांच्या हाती पुन्हा भोपळाच ?

शेतकर्‍यांच्या हाती पुन्हा भोपळाच ?

राजू शेट्टी म्हणाले,शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सैतानाची मदत घ्यावी लागली तरी घेणार, बच्चू कडू म्हणाले,मुख्यमत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकणार, शेकापचे नेते जयंत पाटील म्हणाले,मुंबईचे पाणी तोडू, भाई जगताप म्हणाले, आंदोलनामागे कॉग्रेसचाच ब्रेन,अशोक चव्हाण यांनी तर थेट गोळ्या झेलण्याची भाषा केली या सर्व राजकीय नेत्यांची ही भाषा बघता त्याना शेतकर्‍यांच्या प्रश्र्नांशी कितपत देणं घेण आहे अशी शंका येते.
राजकारण्यांना कटाक्षानं बाजुला ठेवण्याची अगोदर चळवळीची भाषा होती.
आता ही चळवळ पूर्ण राजकीय मंडळीच्या ताब्यात गेल्यानं मला तरी या चळवळीला काही भवितव्य आहे असं वाटत नाही.
चळवळीतले राजकीय चेहरे कधी समोर येतात याची मुख्यमंत्रीही वाट पहात होते - ते आले, आता मुख्यमंत्र्यांना उघड हल्ले करता येतील.
या सर्व घडामोडी आणि पेरण्या तोंडावर आल्यानं आंदोलनाची धग किती असेल आणि आंदोलन किती काळ रेटलं जाईल याची मला शंकाच आहे.
म्हणजे हाती काहीही न लागताच पुन्हा एक शेतकरी आंदोलन मोडीत निघणार आहे.
असे झाले तर त्याला जबाबदार शेतकरी नेतृत्वच असेल.
एक प्रामाणिक मुख्यमंत्री जो तुमच्यासाठी सर्व प्रयत्न करतोय, त्याच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही विघटक प्रवृत्तींच्या नादी लागल्यावर असेच होणार...

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained