आता शेतकरी समाजाने बदललेच पाहिजे

आता शेतकरी समाजाने बदललेच पाहिजे=========================
१. आता ती मंदिरे पुष्कळ आहेत. नवीन मंदिरं उभारणी बंद करा. वर्गणी देऊ नका. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटूंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.


२. दिंड्या, वा-या, सप्ताह यात सहभागी होऊन पापमुक्ती व मोक्षप्राप्ती नादात व्यक्ती प्रगतीचे (वेळ-पैसा-श्रम) चक्रच मारून टाकतो. पैसा व बुध्दीचा अपव्यय होतो. कर्मातच देव आहे यावर विश्र्वास ठेवा. (भक्त पुंडलिक)
३. 'माणूस सोबत काहीच घेउन जात नाही'. हे सांगण्यासाठी बुवा २०,०००रू घेतो. अशा बाबांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा.
४. शेतीतील, कुटूंबातील, गावकूसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.
५. कुटूंबातील सदस्यावर सर्वात जास्त प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दू:खात तेच तुमची जास्त काळजी घेणारे आहेत.
६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा. आणि एकमेकानां व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा.
७. आपण सर्व जाती-धर्मांचा आदर करा. जातीवादाचे पाप आपण तरी करू नका. धर्मांधांच्या नादी लागु नका.
८. मोडेल पण वाकणार नाही. या स्वभावात बदल करा. काळ खूप बदललाय याचे भान असू द्या. (महापुरे मोठी झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती)
९. राजकारण व राजकारणी यांचा नाद सोडा. या दोहोमुळे समाजाचे खूप मोठे नूकसान झालेय. आता बदला म्हणजे पुढच्या अनेक पिढ्याचे कल्याण होईल. यांचा फक्त मत "दान" पुरताच विचार करा.
१०. कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात/नोकरीत/व्यवसायात राहा. किमान ८ तास काम कराच (कुठल्याही क्षेत्रात).
११. खेकडा व्रत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा (एकमेका साह्य करा).
१२. नियोजन व काटकसरीने (आहे त्या उत्पन्नात) जीवन जगा. भोगवादाच्या नादात कर्जबाजारी होऊच नका.
१३. यात्रा, जत्रा, सत्यनारायण, वास्तुशांती, जागरणगोंधळ, डोहाळे(ओटीभरण), पाचवी, बारसे, वाढदिवस मर्यादीतच ठेवा.
१४. भांडकुदळ, लबाड, पैसे बुडवणाऱ्याच्या पासुन लांब रहा.
मदत करणाराचे कायमच ऋणी रहा.
१५. घरातील महीलांना मानाची वागणूक द्या. मुलींना उच्च शिक्षित करा.
१६. महिलांना मंदिरं, उपासना, कर्मकांड यातून बाहेर काढा आणि व्यापारी, उद्बोधन वर्गाला न्या. त्यांच्या हातातील पोथ्या-पुराणांची संख्या कमी करा व इतिहास, विज्ञानाची पुस्तक हातात द्या.
१७. कर्मकांड करणे टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.
१८. आपण कमविलेल्या पैश्यातुनच आपल्या कुटुंबाला खुश ठेवा.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained