ईच्छा न्यूज़: 👨‍🌾🍋 *खाताहा अरब, तरी सुखात आसा परब* 💆‍♂💁‍♂

ईच्छा न्यूज़:
👨‍🌾🍋 *खाताहा अरब, तरी सुखात आसा परब* 💆‍♂💁‍♂
आधीच आंबो अवदा धत्तरमत्तर... 
तेतूत पुन्हा माकडतापाचो डर...
हातीतल्या काजवाक पन उरलो नाय दर..
पन आमका सांगून येवा कोनी, "संप कर!"
शिल्लकच नाय ठेवचव तर!!
कोकणात आमच्या अवकाळी पावस पडताहा,
तेतूर नवल काय, आमचो देव आमच्यासाठी लवकर बरसताहा..
आंबे, काजू, रतांब्याचा नुकसान?
अरे "तो"च न्हेताहा, जो देताहा!!
तेतूर रडाचा काय,
जो आमका कोकणात जल्माक घालताहा, तोच पोसताहा!!
बाबानू, काय होता नाय होता, तेवापासून लढतहव!!...
मुंबैतल्या चाकरमान्याच्या मनीआर्डरीतसुन सावरतहव...
जसा जमताहा,
तशे फुडें चलतंहव!!
जा काय आडया येयत थय उभे रवान नडतंहव!!
रडाच्या दिवसातय नाय कधी रडलव, आता काय रडतलव??
तुमचा बरा हा, नेते तुमचे डोळे फुसाकच उभे हत,
वायज काय झाला, काय आंदोलनाक तयार हत...
तुमका सवयच पडान गेली हा,
उठल्या सुटल्याक रडायचा,
गळफासाक जवळ करून मागच्यांक रस्त्यार हाडायचा!
अरे बाबानू भोग असे, अर्ध्यावरनी संपनत नाय!
तुमका वाटता कोकणात आमच्या, आमका काय दुखनी नाय?
डुकरा, कोले, कुत्रे, वांडर सगळे आमच्या उरार आसत !
हत्तीसुद्धा पेलतव आम्ही, सोबत वादळी वारे आसत!!
पावसापान्याक, उनावाऱ्याक आमी तकरार सांगनव नाय,
नेते आमचे करतीत कायतरी, आशेर आम्ही रवनव नाय...
नेते आम्ही पाठवतव ते, देशाक- राज्याक सावरूसाठी.
आमच्या संकटाक पुरेशी आसता, आमच्या कुणग्यातली चिवारनीची काठी!
आम्ही कधी उभे नाय नुकसानभरपायच्या रांगेत
खता, कीटकनाशका.. आमी निवडुनच वापरतव बागेत..
विषमुक्त अन्न आमचा, आमी फायद्याचे भुकेले नाय,
गावात तेच्यात समाधानी, देवाक कधी इसारलेले नाय...
तुमचा कसा शंभर टक्के अनुदानातसून वावारतलास,
सगळा गावला फुकट तरी, देणाऱ्यार घसारतालास!
आमच्याकडे सावकाराक
आम्हीच ठेवतव दाबून
तुमच्यासारखे कधीच समोर रवनव नाय वाकून...
तेंच्यासमोर कधीच तुमचो होना नाय एल्गार,
पुढाऱ्यांच्या नादाक लागान उठसूट फक्त दिसता सरकार..
आमच्याकडे आमीच सरकार, संध्याकाळचो आमचोच दरबार!
अर्धो आमचो कारभारनीर
नि उरलो आमचो देवार भार!!
कीर्तन आणि तमाशात .
आमी फरक करनव नाय,
संप करून, दुसऱ्याचो माल ओतूक ट्रक फोडनव नाय!!
आमचा बाबानू बरा चल्लाहा
आसात तेच्यात सुखी आसव,
तुमची ती लाभाची गणिता, संप आमका नकोच शिकव!
कधीतरी जमलाच तर कोकणात फिरान जावा..
आम्ही जेचार समाधानी ती, संस्कृती आमची बघून जावा..
आमच्याकडे आम्ही करतव,
सगळा देवाकडे बघून
जगन्याची मिळता ताकद आमका,
जेव्हा चरनार दितव झोकून..
फरक पडना नाय जरी
अरब गेलो खावन,
परब आसा घरभर समाधान पावान!!
गावोगावी हय रवळनाथ बसलो हा राखुक...
कोकण आसा ह्या भाऊ, आजुन बसलहव नाय मापुक!!!
--- अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained