बळीदादा तूच सांग

बळीदादा तूच सांग
बळीदादा, तूच सांग
पंधरा वर्षे सडत होतास....
शरददादा सोबत काय,
तेव्हा लेझीम खेळत होतास?
बांधावरती मावळच्या
गोळ्यासुद्धा चालवलेल्या
मेलेल्या भावांसाठी,
यांच्या नावाने रडला होतास?
तेव्हा तुझी कारभारीन,
खरं सांग सुखी होती?
खाऊन पिऊन मस्त, कि
तेव्हाही पोरं भुकी होती?
पाण्याची ती तुझी आस
असा कसा विसरलास?
धरणात तुझ्या मुतणारा
दादा आज वाटतो खास?
पंधरा वर्षात खरं सांग
कफन तरी दिलं का?
चारा खाल्ला, खत खाल्लं
व्याज कुठे सोडलं का?
आज तुझं शिवार फुलण्या
केलेलं काम तरी बघ
प्रामाणिक कामासाठी
सरकारमध्ये आहे रग
कोल्ह्याकुत्र्यांच्या ओरडीमध्ये
तुझा आवाज मिसळू नको,
लांडग्याच्या कळपाला
असा बेसावध मिळू नको
जलयुक्त शिवाराने
दुष्काळावर केलीस मात
कोणाच्या नादी लागून
वामनाची शोधतोस जात?
बांधाकडे आजवर तुझ्या
कधी कोण वळला आहे?
मुख्यमंत्रीच योजनांमधून
शिवारी तुझ्या पोचला आहे!
वस्तूस्थिती घे जाणून
शिक्षण तुझ्या संस्कारात आहे
आजवरचे दुःख ओळखत
सरकार तुझ्या शिवारात आहे
तुला भिकारी करणारे
शाश्वत विकास काय समजणार?
यापुढे शाश्वत शेतीत पुढील पिढी सावरणार
दलालीच्या भिंती फोडत
योजना येत थेट आहेत
म्हणूनच दलालांची
स्वार्थी काळजं पेटत आहेत
साता जन्माचं पाप तुझं
आघाडीत भोगून सरलं आहे
विश्वास ठेव, भविष्य तुझं
इथे आता उज्ज्वल आहें !!
---- अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034