शिवाजीराजे, अफझलखान आणि समाजद्रोही पवार

शिवाजीराजे, अफझलखान आणि समाजद्रोही पवार
धार्मिक बाबींमध्ये आम्ही स्वत:हून तुमच्या आड येणार नाही; किंबहुना तुमच्याबद्दल आदरच ठेवू, मात्र आमच्या धर्माशी खेळाल, तर मात्र तुमची धडगत नाही, हाच संदेश राजांनी वेळोवेळी दिलेला नाही काय?

.
परवा पवारांनी कृष्णाजी कुलकर्णीचा उल्लेख करताच त्यांच्यामागे स्टेजवर उभा असलेला दिवटा कसा उधळला, हे पाहिले तरी पवारांनी वाढवलेल्या जातद्वेष्ट्या पिलावळीचे स्वरूप पहायला मिळेल. एरवी राजकारणी राजकारणात सार्वजनिकपणे मुतण्याबद्दल बोलले किंवा कोणाला साले म्हटले तरी असे चार आण्याची अक्कल असलेले, स्वत:चा विचार करू न शकणारे लोक उधळतच असतात. पण येथे मामला यांच्या जातद्वेषाचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. या कृष्णाजीशी मला काडीचेही घेणेदेणे नाही. महाराजांनी त्याला माफ केल्यानंतर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा वाईमध्ये हयात असल्याचे दाखले उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर त्यानेच खानाच्या वाईट हेतुबद्दल सावध केल्याचेही काही उल्लेख आहेत. यातील खरेखोटेपणावर प्रकाश टाकण्याची विनंती मी वेगळ्या पोस्टमध्ये केलेली आहे, परंतु तो वेगळा मुद्दा.
पवारांनी वाढवलेली ही पिलावळ कृष्णाजी कुलकर्णीचा (म्हणजे तो ब्राह्मण असल्याचा) किती वेळा उल्लेख करते, त्यामानाने जावळीच्या मोरेंचा किती वेळा उल्लेख होतो, म्हणजेच यांचा हेतु काय हे लक्षात येत नाही काय?
अफझलखान उर्फ अब्दुल्ला भटियारी याच्या भेटीच्यावेळी शिवाजीराजांचा वकील गोपिनाथपंत बोकील हादेखील उपस्थित होता. आजवर कृष्णाजी कुलकर्णीचे आडनाव लपवून ठेवत त्याचा उल्लेख केवळ कृष्णाजी भास्कर असाच का केला जात असे, असे विचारणारी ही पिलावळ राजांबरोबर असलेल्या या ब्राह्मण बोकिलचे तरी नाव सांगत होती का? तेव्हा त्यांचा खरा हेतु कळणे अवघड आहे का? शिवाय या कृष्णाजीचे काय झाले ते असेल, आणखी काही ब्राह्मणांनीही त्यावेळी स्वराज्याविरूद्ध काम केलेले असेल, परंतु राजांच्या विरोधात लढलेल्या त्यावेळच्या मराठ्यांची संख्या कितीतरी पटींनी अधिक होती की नाही? तेव्हा कृष्णाजीच्या नावाने रान पेटवणार्‍या या दळभद्र्यांना पवारांनी कोणत्या मुशीतून तयार केले असावे? अाज या कृष्णाजीचे नाव या पिलावळीच्या चिल्ल्यापिल्ल्यांच्याही तोंडी आहे ते कशामुळे असेल?
बाकीचे जाऊ दे, अफझलखानाच्या अंगरक्षक दलात शिवाजीचा एक काका व दोघे चुलत सासरे होते हे तरी ही पिलावळ सांगते का? शिवाजीराजांच्या अंगरक्षकांमध्ये सिद्दी इब्राहिम नावाचा अंगरक्षकही असल्याचेही असे दिसते. पवार हेदेखील सांगत नसले, तरी माझ्या मानत ब्राह्मण, मराठा किंवा मुस्लिम अशा कोणाबद्दलच कसला किंतु नाही म्हणून मीच हे मुद्दाम सांगतो.
मुळात आपण म्हणतो की अफझलखानाने दगा दिला म्हणून शिवाजीने वाघनखांनी त्याला मारले. एका पर्शियन नोंदीमध्ये शिवाजीने दगा दिल्याचा उल्लेख आहे. याच उल्लेखावरून शिवाजीचे कृत्य dastardly च्या ऐवजी bastardly असल्याचे खुशवंतसिंग यांच्या लेखात मागे चुकून छापले गेल्यामुळे मोठा वाद झाला होता. १६३९मध्ये शिरे (सेरा) इथल्या कस्तुरीरंगा या राजाला शांततेसाठीची बोलणी करण्यासाठी बोलावून खानाने ठार केल्याची माहिती राजांकडे होती. शहाजीराजे अदिलशाहीच्या खान मुहम्मद (सिद्दी रायहान) या ज्या वजीराच्या पक्षाचे होते, त्या खान मुहम्मदची हत्या अफझल खानाने १६५७मध्ये विजापूरच्या भर रस्त्यात घडवून आणली होती. शिवाजीला संपवण्याच्या मोहिमेवरून आपण जिवंत परतु की नाही, या शंकेपोटी त्याने मोहिमेवर निघण्यापूर्वी स्वत:च्या त्रेसष्ठ बायकांना ठार केल्याचीही वदंता होती. संभाजी (शंभूजी) या जिजाबाईंच्या मोठ्या मुलाला याच अफझलखानाने पूर्वी कपटाने ठार केलेले होते. तेव्हा मुळात हा कोणत्याही प्रकारचा भरवसा ठेवण्याच्या योग्यतेचा होता का? या सगळ्यांची सांगड कशी घालायची? वर म्हटल्यामुळे हा खान प्रतापगडावर पोहोचेपर्यंत हिंदूंची श्रद्धास्थाने फोडत आलेला होता. या सर्वांमुळे शिवाजीराजांच्या मनात या भेटीच्यावेळी काय चालले होते हे निश्चितपणे कळणे शक्य आहे काय? याशिवाय या भेटीचे फलित काहीही होवो, खान जिवंत परतु नये याकरता सारी व्यवस्था शिवाजीराजांनी करून ठेवलेली होती. पवार हे सगळे सांगतात का? तेव्हा शेजवलकरांसारख्या इतिहास संशोधकांचा पवार केवळ सोयीनुसार उल्लेख करतात. याआधीही स्वत:च्या मुलीनेच तोंड भरून कौतुक केलेले महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास संशोधक कसे नाहीत, हे आपल्या या पिलावलीला खुश करण्यासाठी यांच्या तोंडून ऐकावे लागणे हेही सर्वांना सहन करावे लागले होते.
शिवाजीवर चालून येताना तुळजाभवानीच्या देवस्थानाची, तेथील भवानीच्या मुर्तीची, पंढरपूरच्या देवस्थानाच विटंबना करणारा हा खान केवळ स्वराज्याचा शत्रू असू शकतो म्हणजे हिंदूंचा शत्रू नाही, असे समजणारे पवार आपले डोके कोठे गहाण ठेवून बोलत असतात? राजांच्या साथीदाराने खानाचे मुंडके उडवले, एरवी मंदिर पाडून बांधलेल्या मशिदीही राजांनी उध्वस्त केल्या, धर्मांतर करणार्‍या पोर्तुगिजांच्या ख्रिस्ती धर्मगुरूंचा शिरच्छेद करून पोर्तुगीज गव्हर्नरला त्यांनी धडा शिकवला होता, विजापुरात गाय मारणार्‍या कसायाचा महाराजांनी हात तोडला होता. या गोष्टी पवारांच्या तोंडातून कधी बाहेर पडणार आहेत का?
धार्मिक बाबींमध्ये आम्ही स्वत:हून तुमच्या आड येणार नाही; किंबहुना तुमच्याबद्दल आदरच ठेवू, मात्र आमच्या धर्माशी खेळाल, तर मात्र तुमची धडगत नाही, हाच संदेश राजांनी वेळोवेळी दिलेला नाही काय? मग तो यांच्या व यांच्या पिलावळीच्या पचनी कसा पडत नाही? याच न्यायाने औरंगजेबही मुसलमान असल्यामुळे संभाजीराजांना धर्मांतर करण्याची जबरदस्ती करत नव्हता, म्हणजे तेही राज्यविस्ताराचेच डावपेच होते, असे म्हणण्याची हिंमत पवार दाखवतील काय? हे शक्य नाही, कारण मग यांच्या पिलावळीलाच हे पटणार नाही. तर मग अफझलखानापाशीच यांचे काय गाठोडे ठेवलेले आहे?
दुसरी बकवास सांगितली जाते ती म्हणजे पंढरपूर-तुळजापूरची मंदिरे उध्वस्त करण्यामागे केवळ त्या मंदिरांमधली संपत्ती लुटण्याचा अफझल खानाचा हेतु होता. संपत्ती लुटताना तुळजाभवानीची मूर्ती उध्वस्त करण्याची काही गरज असते का हो? की खानाने हवे ते केले तरी आपणच त्याला सांभाळून घ्यायचे?
यांचे कारस्थान काय असू शकते पहा. एकदा का शिवाजीराजांनी अफझलखानाला तो मुस्लिम होता म्हणून मारले नाही, ही बकवास पसरवली व कोणी या दळभद्रीपणाबद्दल त्यांचा निषेध केला नाही, की आपोआपच सर्वांच्या खानाच्या बाबतच्या संवेदना बधीर होतील. की मग त्यांच्या कबरीच्या ठिकाणी जो उरूस भरवला जाई (तो बहुधा आता बंद अाहे), तो पुन्हा चालू करू देऊन तेथे चादर चढवायला आणि आधुनिक सर्वधर्मसमभावाची बकवास शिकवायला आव्हाड व स्वत: पवार मोकळे. अफझलखानाचा कोथळा काढल्याच्या चित्रावर बंदी येईल. कारन मग अशा हिंस्त्र चित्रामुळे पिलावळीच्या कोमल मनवर किती विपरीत परिणाम होईल! असे कारस्थान पवारांच्या गरळीमागे अाहे. (अफझलखानाने काय काय उद्योग केले हे पाहिले आणि त्याची स्वारी हे हिंदवी स्वराज्यावरील केवढे मोठे संकट होते हे लक्षात घेतले, तर केवळ मतांसाठी आपल्याच एकेकाळच्या मित्रपक्षाला अफझलखानाच्या फौजा असे सवंगपणे म्हणणार्‍या उद्धव ठकवणारे यांचे डोके तरी ठिकाणावर होते का हे पहावे लागेल. मुळात खान दिल्लीवरून आला हे सांगण्याचा दिवटेपणाही त्यांना टाळता आला नाही ही आणखी वेगळी गोष्ट.) यापुढे अफझलखानाचा उल्लेख जो कोणी अशा पद्धतीने फालतु राजकीय कारणांसाठी करेल त्याच्या तोंडात शेण घालण्याची गरज आहे.
तर अशी ही जातीयवादी पिलावळ आणि तिचे सरदार पवार.
शिवाजीराजे मुसलमानविरोधी नव्हते; पण आजच्या हलकट राजकारण्यांप्रमाणे कट्टर मुस्लिम नेत्यांचे लांगूलचालन करणारे म्हणजे पवारांसारख्यांच्या विकृत अर्थाने सर्वधर्मसमभाव बाळगणारेही नव्हते; उलट अशा बाबतींमध्ये ते चांगले खमके होते, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायला हवा.
तेव्हा पवारांनी राजांच्या नावावरून आजवर खूप मस्ती केली. खेडकर-कोकाटे या जातद्वेष्ट्यांना हाताशी धरून समाजात जातद्वेषाचे विष पसरवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला. उर्वरित आयुष्यातही या माणसाची समाजासाठी काही सकारात्मक करण्याची इच्छा दिसत नाही. हा माणूस असा घाणेरडेपणा का करत असेल? अगदी आजही शिवाजीराजांच्या नावाचा दुरूपयोग करण्याचेच त्यांचे धंदे चालू आहेत, तेव्हा याच राजांनी या तोतया जाणत्या राजाचे म्हणजेच समाजद्रोही पवारांचे काय केले असते हे वेगळे सांगण्याची गरज आहे काय?

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034