गोब्राम्हण प्रतिपालक आलं कुठून.
शंभूराजांनी आपल्या बुधभूषणम या ग्रंथाच्या दुसर्या अध्यायात श्लोक क्र. 554 मध्ये शिवरायांना गोब्राम्हण प्रतिपालक संबोधलं आहे.
आताचे नेते ,समाजसेवक,लेखक,संशोधक, अभ्यासक हे संभाजी महाराजांपेक्षा शहाणे आहेत की काय ?
बुधभूषणम् -
छत्रपती संभाजी राजेंनी लिहीलेलं एक ऐतिहासिक पुस्तक...

१९२० साली प्रा. वेलिंगकर यांना एका संस्थेने संस्कृत साहित्याची सूची बनवण्याचे काम दिले होते. ते करता करता अचानक त्यांना बुधभूषणम् नावाचा ग्रंथ (हस्तलिखित) हाती लागला. जेव्हा ते अधिक खोलात शिरले तेव्हा तो चक्क शंभूराजे म्हणजे छत्रपती संभाजीमहाराजांनी रचलेला आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांना हे खरे वाटेना. कारण तोवर संंभाजीराजांची प्रतिमा व्यसनी, व अत्यंत वाया गेलेली व्यक्ती अशीच करून देण्यात आली होती. म्हणून प्राध्यापकांनी अधिक शोध घेतला. तेव्हा त्यांना शंभूराजांचे एक वेगळेच व्यक्तीमत्व हाती लागले. बालपणी शिवाजीमहाराजांच्या आग्रा सुटकेच्या वेळी बाल शंभूंना बनारसच्या एका पंडिताघरी ठेवण्यात आले होते. तिथे त्यांनी संस्कृतचे ज्ञान घेतले. त्यांच्या कुशाग्र बुद्धीने ते आकलनही केले. आणि आयुष्यभर जतनही. त्यानंतरच्या आयुष्यात त्यांनी कायम मोठमोठ्या विद्वानांशी संगत ठेवली. आणि त्यांनी हिंदीतूनही नखशिखा आणि नायिकाभेद अशासारखी काव्येसुद्धा केली.
या संशोधनानंतर शंभूराजांच्या चरित्राचे अनेक पदर उलगडत गेले आणि या महान गुणी योद्ध्यावर लागलेल्या कलंकांचे डाग कुठल्याकुठे विरून गेले. आज छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व वादातीतपणे मान्य केले गेले आहे.जगातील सर्वात महान आणि आदर्श राजांपैकी ते एक होते.
बुधभूषणम् या संस्कृत काव्यग्रंथात शंभूराजांच्या संस्कृत ज्ञानाचा, त्यांच्यावरील संस्कारांचा आणि त्यांच्या विचारांचा परिचय होतो.
प्रत्येक मराठमोळ्याने संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ ई साहित्य प्रतिष्ठान आपल्या वाचकांसाठी ई पुस्तक रुपात सादर करीत आहे.
हा ग्रंथ इसाहित्यवर पीडीएफ स्वरूपात मोफत वाचायला मिळेल. संस्कृतमध्ये आहे, मराठी भाषांतर नाही.
http://www.esahity.com/…/501…/budhabhushan__sambhajiraje.pdf
मराठी अनुवाद

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained