दरी व दुरावा

दरी व दुरावा
शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे - मी लहान असताना हे शिकलो - आता माझी मुले ही तेच शिकली.
जय जवान - जय किसान हा नारा गेली ७० वर्षे या देशातील लोक देत आहेत.
शेतकरी आत्महत्या बद्दल वाचले की मन सुन्न व्हायचे.
त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटायचे.
2008 मध्ये त्यांना मदत म्हणून संपूर्ण कर्ज माफी देण्यात आली त्याचे सर्वांनी स्वागत केले .
मात्र यावेळी जेव्हा शेतकर्यांनी आपल्या आंदोलनाचे नेतृत्व काही राजकीय पक्षांच्या हातात दिले - त्या पक्षांनी ज्या निंदनीय पद्धती ने आंदोलन चालवले - त्यामुळे शेतकरी वर्गाने सर्व सहानुभूति गमावली.
एवढेचच नव्हे तर शहर विरुद्ध ग्रामीण असे चित्र निर्माण झाले आहे.
पटत नसेल तर मला Whatsapp वर आलेली पोस्ट शेअर करीत आहे ती वाचा -

यापुढे शेतकरी, त्यांचे नेते आणि त्यांच्या चमच्यांनी शहरी माणसाला पैशांवरून शिकवायला जाऊ नये...
अदानी, अंबानी, मालया यांना बोलायचा हक्क तुम्ही गमावला आहे...
यापुढे तुम्ही अन्नदाते, बळीराजा वगैरे काही नाही...
तुम्ही सुद्धा धंदा बुडीत खाती घालवणारे व्यावसायिक आहात...
सरकारी कर्मचारी, नेते याप्रमाणे तुम्ही सुद्धा सामान्य जनतेची लूटच केली आहे...
या जागतिकीकरणाच्या जमान्यात आम्ही तुमच्यावर अवलंबून नाही हे लक्षात ठेवा...
ही कर्जमाफी मिळतेय ती आम्ही कर भरतोय त्यातून हे लक्षात ठेवा...
आम्ही शहरात राहून, कर्ज काढून घर घेतो, गाडी घेतो...
ते फेडण्यासाठी 10-10 तास कामावर घासतो...
आम्हाला कर्ज फेडता आली नाहीत म्हणून आत्महत्या करता येत नाही, आणि केली तरी कोणी नेता सहानुभूती दाखवत नाही की कोणी सेलिब्रिटी मदत करायला पुढे येत नाही...
तेव्हा आम्ही आमच्या पैशांनी बाहुबली बघू....
शंकरावर दुधाचा अभिषेक करू...
भाजी घेताना घासाघीस करू...
शेतकरी, नेते, उद्योजक या सर्वांच्या कर्जफेडीसाठी आम्ही कर भरलेला आहे...
बँका बुडू नयेत म्हणून आमच्या कर्जाचे हप्ते भरलेले आहेत...
आम्हाला वाटत आणि पटतं त्या गरजूंना मदतही करतो...
तेव्हा आता आमच्या पैशाचं आम्ही काय करायचं ते आम्हाला शिकवायला येऊ नका...
इतरांना सुधारता येत असेल तर बघा नाहीतर थोबाड बंद ठेवा...
( सदर पोस्ट मधील विचारांशी मी पूर्ण सहमत नाहीं - मात्र ते समाजात राजकारणी लोकांनी निर्माण केलेल्या दरी ची द्योतक आहे)

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034