CCTV and GPS


CCTV - GPS
तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुलांसाठी GPS आहात की CCTV ?



गंमतशीर वाटला ना प्रश्न ? हे काय आता नवीन ?
पण विचार करून बघा… आई-बाबा ना GPS सारखे असायला हवेत. आपण प्रवासाला जाताना GPS वापरतो ना रस्ता कळण्यासाठी तसेच! आपण विचारले की हे GPS आपल्याला ईप्सित स्थळी पोहोचण्यासाठी किती वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत हे सांगते, त्यातला सर्वात सुलभ कोणता हे सुद्धा सांगते... पण हे सांगताना GPS मी सांगेन त्याच मार्गाने तुम्ही जायला हवे असा आपल्याकडून हट्ट नाही धरत. म्हणजे समजा आपण जरा वेगळाच रस्ता पकडला किंवा एक चौक पुढून जायचा प्रयत्न केला तर ते न कुरकुरता, न चिडता नव्याने मार्ग दाखवणे सुरु करते. जमेल तितके आपल्याला तिथलीही दिशा दाखवत राहते... आणि जर तो रस्ता आजवरपेक्षा जास्त चांगला निघाला तर पुढे इतरांना तोही रस्ता आहे अशी जाणीव करून देते.
अगदी निर्मनुष्य ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रवास करताना या GPS ची साथ आपल्याला आपण बरोबर रस्त्यावर आहोत याची जाणीव करून देते... अश्या या निर्धास्त अवस्थेत आपण न बिचकता, न थांबता, जलदपणे आपले ध्येय गाठू शकतो. हो की नाही? विवेकी पालकत्व हे असं असायला हवं. दिशा दाखवणारे... पण माझेच ऐकले पाहीजे हा हट्ट न धरणारे.
पण आपला बऱ्याचदा होतो तो CCTV! तो कसा दुसऱ्याच्या प्रत्येक लहानसहान हालचालीवर बारीक लक्ष ठेऊन असतो, अगदी तसे!  CCTV च्या लक्ष ठेवण्यामागे काहीसा अविश्वास ही असतो आणि ‘बघतोय हं मी!’ असा धाक ही.
CCTV ची नेहमी धास्ती वाटते आणि त्याउलट GPSचा आधार.
आता पालक म्हणून आपणच मागे वळून बघूया आपण आपल्या मुलांसाठी आजवर नक्की काय होतो ते!

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034