कँप्टन जिंकला.....कँप्टन हरला...


कँप्टन जिंकला.....कँप्टन हरला...


आयपीएल यंदा हैद्राबाद संघाने पटकावले. बेंगलोर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले . गेल..डिव्हिलीयर्स..वँटसन...विराट कोहली या दिग्गज खेळाडूचा बेंगलोर संघ विजयासाठी बहुतांशी फेव्हरीट होता . तरीही डेव्हिड वाँर्नर या जिगरबाज खेळाडूच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद संघाने बेंगलोरला नमवत इतिहास रचला.


आयपीएलमध्ये विराट कोहली हा प्रतिभावान खेळाडू पुन्हा एकदा आपल्या अंगभूत तेजाने तळपला. सुरूवातीला पराभव येऊनही संघाला फायनल गाठून देण्यात सिंहाचा वाटा विराटचा होता . तरीही या खेळाडूला अंतिम सामन्यात अपयश आले तेव्हा त्याच्या नेतृत्व करण्याची पद्धती पुन्हा नव्याने तपासायला हवी. कारण उद्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराटकडे पाहिल जातय.


नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने स्वतःला सिद्ध कराव लागते हे खरे . विराटने स्वतःला यैध्दा म्हणून सिद्ध केलय यात वाद नाहीय . पण...पण एकट्या सेनापतीच्या पराक्रमावर युद्ध जिंकता येत नाही हे सत्य आहे. आपल्या सहकारी खेळाडूना प्रोत्साहीत करणे..त्यांच्याकडून चांगली कामगिरी करवून घेणे...त्यांच्यातील बलस्थाने शोधून त्यांना मार्गदर्शन करणे....हे असे कसब नेतृत्वला असावे लागते . ह्या बाबतीत विराट थोडा कमी पडला. वँटसन सारखा अष्टपैलू खेळाडू पूर्ण मोसमात बहरात येऊ शकला नाही .


क्रिकेट हा फलंदाजाबरोबरच गोलंदाजाचा खेळ आहे हे बेंखालोरला पूर्णपणे जाणवले नाही . म्हणून एकही गोलंदाज आपली छाप पाडू शकला नाही . हे दोन मुख्य फरक विराटचा बेंगलोर व वाँर्नरचा हैद्राबाद संघात होते . विराटच्या बरोबरीने वाँर्नर या आयपीएल मध्ये तळपलाय. संघ अडचणीत आला तर स्वतः योध्दाप्रमाणे वाँर्नर लढत राहीला. नेतृत्व बाबतीत विराट पेक्षा उजवा ठरला हे कबूल करावे लागेल. कटींग हा अष्टपैलू खेळाडू फायनल मध्ये ३९ रन्स मोक्याच्या क्षणी  बनवल्या व गोलंदाजीत दोन महत्त्वाचे बळी घेतले . भुवनेश्वर कुमार हा गोलंदाज सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. या दोन्ही गोष्टीत वाँर्नरचे कर्णधार म्हणून योगदान मोठे आहे.
खेळात हारजीत चालायचीच.


पण तरीही उणीवा शोधून त्या कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विजयाकडे वाटचाल असते. विराटमधील खेळाडू अप्रतिम आहे यात शंका नाही परंतु त्यातील कँप्टनला मात्र अजूनही कष्ट घ्यावे लागतील. धोनी सहजासहजी बनत नाही . विराट या पराभवातून जरूर शिकेल.
तूर्त डेव्हिड वाँर्नर या जिंकलेल्या कँप्टनचे मनापासून अभिनंदन ...

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained