५० कोटी डॉलर्सचा – चाबहार करार : भारताचं चीन-पाक युतीला उत्तर
५० कोटी डॉलर्सचा – चाबहार करार : भारताचं चीन-पाक युतीला उत्तर
चीन आणि पाकिस्तानची भारतविरोधी कपटी युती सर्वश्रुत आहे.
भारताला सर्व बाजूनी घेरण्यासाठी योजलेली “स्ट्रिंग ऑफ पर्ल्स” योजना असोत वा काश्मीरमधील पाक-पुरस्कृत कुरापातीना दिलेला आधार असो – चीन ने भारताला शक्य त्या सर्व प्रकारे घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
चीनच्या ह्या रणनीतीवर भारताने दिलेल्या काही उत्कृष्ट प्रत्युत्तरांपैकी एक आहे – नुकताच झालेला – चाबहार करार.
हा करार “जलद गतीने” पूर्ततेकडे सरकावा ह्यासाठी सुषमा स्वराजजींनी इराण भेटीत विशेष प्रयत्न केले होते.
त्याचीच परिणीती म्हणून नरेंद्र मोदींच्या इराण दौऱ्यात ह्या करारावर शिक्कामोर्तब झालं.
नेमका काय आहे चाबहार करार ?
सुषमा स्वराज ह्यांच्या तेहरान दौऱ्यात इराण आणि अफगाणिस्तान ह्यांनी चाबहार कराराच्या जलद पूर्ततेबद्दल हमी दिली गेली, आणि मोदींच्या दौऱ्यात त्यावर स्वाक्षरी झाली. ह्या करारानुसार चाबहार इथे भारत एक मोठं बंदर विकसित करणार आहे. भारत – अफगाणिस्तान व्यापारी संबंध दृढ होण्याच्या दिशेने ही मोठी झेप असेल.
स्त्रोत
भारतासाठी हे बंदर लवकरात लवकर तयार होणं अनेक कारणांनी आवश्यक आहे.
१) सध्या पाकिस्तान त्याच्या जमिनीवरून भारताला आपला माल मध्य आशिया आणि युरोपला पाठवू देत नाही. त्यामुळे आपली त्या देशांमधे भू-मार्गाने होणारी निर्यात पूर्णपणे थांबली आहे. (जी स्वातंत्र्यपूर्वी खुश्कीच्या मार्गाने व्हायची.) ह्या बंदरामुळे पाकिस्तानच्या गरजेशिवाय भू-जल मार्गाने ह्या भूभागाशी मोठा व्यापार सुरू होणार आहे.
२) पाकिस्तानने चीनसोबत चाबहार पासून ७२ किमी अंतरावर ग्वादार बंदर विकसित केलं आहे – ह्याला प्रत्युत्तर म्हणून आपलं चाबहार हे बंदर आहे.
३) ह्या बंदरामुळे मध्य आशिया आणि युरोपाशी भू-मार्गाने व्यापाराचा मार्ग केवळ खुलाच होणारे असं नाही – तो फार धडाक्यात खुला होणार आहे. कारण हे बंदर प्रचंड मोठं असणार आहे, तब्बल २५ लक्ष टन माल हाताळण्याची क्षमता ह्या बंदरात असणार आहे.
४) पर-राष्ट्राच्या जमिनीवर बांधून विकसित केलेलं भारताचं हे पाहिलं बंदर असेल.
५) भारत-अफगाणिस्तान-इराण ह्यांच्या समन्वयाने विकसित केल्या जाणाऱ्या ह्या बंदरासाठी भारत ५० कोटी डॉलर्सची मदत करणार आहे.
राजकीय विश्लेषक सौरभ गणपत्ये म्हणतात :
===
चीन ने पाकिस्तानला बांधून दिलेले ग्वादर नावाचे बंदर द्यायचे आणि भारताने इराणला बांधून द्यायला घेतलेले ‘चाबहार’ बंदर या दोघांमधले अंतर पुणे सातारा पेक्षा कमी आहे.
दरायस राजाच्या काळापासून आपले इराणशी संबंध असल्याचा दाखला देत भारताने नेहमीच या देशाला दखलपात्र ठेवले. अगदी अमेरिकेने डॉलर मधल्या व्यवहारांवर बंदी आणल्यावरसुद्धा रुपयांमध्ये सबंध ठेवले. चाबहारचा मार्ग बलुचिस्तानच्या जवळ आहे. ‘मुझे इन भेडीयोंमें मत भेजो’ असे टाहो फोडून सांगणाऱ्या सरहद गांधी, भारतरत्न खान अब्दुल गफार खान ह्यांनी एकेकाळी गाजवलेला हा इलाका. या भागातल्या हिंसाचाराला भारताची फूस आहे असा पाकिस्तानचा जुनाच आरोप आहे. यामुळेच चाबहारच्या निमित्ताने भारतीय पळी पंचपात्र या मोक्याच्या भागात राहणे पाकिस्तानला परवडणारे नाही. याउपर या भागात चीनची मोठी गुंतवणूक तर आहेच शिवाय पाकिस्तानात आपले हातपाय पसरायला हा भाग मोक्याचा आहे. सध्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर दोघांनाही पाकिस्तानात राहायचे नाही. तेहरिक ए तालिबान या अक्राळ विक्राळ संघटनेला भारताचा पाठिंबा आहे हे तिकडे लहान मुलं पण सांगतात.
शेजारच्या देशाला अस्थिर करायचं आणि त्याच्या शेजाऱ्यांना आर्थिक सामरिकदृष्ट्या कुरवाळायचं हे कौटिल्याने सांगितले आणि त्यावर आपल्या राज्यकर्त्यांनी बखुबी अंमल केलाय.
भारताने गेल्या एक हजार वर्षांत कोणावरही आक्रमण केले नाही किंवा या देशाची इतरांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करण्याची महान परंपरा आहे असा ज्यांचा समज आहे त्यांच्यासाठी हे पचायला अवघड आहे, पण त्याला इलाज नाही
===
२०१३ पासून ह्या दिशेने प्रयत्न सुरु होते. वेगवेगळ्या अडचणींमुळे हा करार वेगाने पुढे सरकत नव्हता, जो आता जलद गतीने पूर्ण झाला आहे.
खुष्कीचा भू मार्ग बंद झाल्यामुळे विपरीत दुष्टचक्रात अडकलेली मध्य आशिया आणि युरोपला होणारी भारतीय निर्यात आता भू-जल मार्गाने परत जोमाने सुरू होणार आहे !
जय हो !
Comments
Post a Comment