अरे जात म्हणजे काय = A new perspective to "Caste"..

अरे जात म्हणजे काय

बघा तुम्हाला आवडते का?
जातीचं काय घेउन बसलात राव...
अरे जात म्हणजे काय
माहित तरी आहे का..?
अरे कपडे शिवणारा शिंपी,
तेल काढणारा तेली,
केस कापणारा न्हावी
लाकुड़ तोडणारा सुतार
दूध टाकणारा गवळी
गावोगावी भटकणारा बंजारा
वृक्ष लावणारा माळी
आणि लढाई लढणारा क्षत्रिय...
आलं का काही डोस्क्यात..?
आरं काम म्हणजे जात...
आता भांडत बसण्यापेक्षा
जाती बदला...
आता इंजीनीयर ही नवी जात...
कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात...
"सी. ए" ही पोटजात,
"एम. बी. ए" ही नवी जात...
बदला की राव...
कवाचं तेच धरुन बसलात...
घरीच दाढी करता नवं?
मग काय न्हावी का?
बुटाला पालीश करता नव्हं?
मग काय चांभार का?
गैलरी टेरेस वर झाडे लावता ना
मग माळी का?
दूध टाकणारा मुलगा गवळी का?
आरं बायकोच्या धाकानं का हुईना
संडास साफ करता नव्हं?
मग काय........?
आता अजून बोलाया लावू नका
आरं जात न्हाई ती जात.....न?
बरं जात नाही तर बदला की मग...
आरं कोण मोठा कोण छोटा?
ह्याला बी दोन हात त्याला बी दोनच नव्हं?
ह्यालाबी खायला लागतं
आणि त्याला काय फक्त....?
आरं कामानं मोठं व्हा,
जातीनं न्हाय...
आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला,
हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय?
मंग कशाला उगीचच?
सगळ्याला आता काम हाय...
सगळ्याला शिक्षाण हाय...
शिकायचं...
कामं करायची...
पोट भरायची...
की हे नसते उद्योग करायचे..!
एक नविन विचारधारा

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained