How Jewellers cheat people.
. 💸 सोनारच श्रीमंत का ?💸
1) स्वतचे शुन्य रुपये भांडवल लावुन, लोकांकडून दरमहा एक हजार किंवा त्या पेक्षा ही जास्त पैसे जमा करण्याच्या स्किम मध्ये आपलेच पैसे आपल्याला व्याज रुपाने किंवा त्याचे सोने दिले जाते.
यावर सरकार तसेच पोलिसांचे कायदेशीर नियंत्रण असले पाहिजे, कारण एखादा सोनार आर्थिकदृष्टीने बुडाला तर खुप लोकांचे अतोनात नुकसान होईल.
2) सध्या सराफी दुकाने बंद आहेत, कारण सरकारने आणलेल्या नविन कायद्यामुळे अनैतिक (गैरव्यावहार ) कोणालाही करता येणार नाहीत. पण बंद चे कारण असे सांगतात की सरकार एक टक्का कर लावणार आहे म्हणून. पण तो तर ग्राहकच देणार आहे ना, मग सराफाच्या खिशातून थोड़ीच जाणार आहे.
आणि खरच सराफांना ग्राहकांची इतकी काळजी आहे का ?
3) आपण आपली सोन्याची वस्तु पॉलीश करायला देतो, तर त्यातील पॉलीश झाल्यावर आपले सोने नक्कीच कमी भरते
हे कोणालाही माहित नाही, कारण ज्या अॅसिड मध्ये टाकले जाते ते सोन्यातील काही अंश सोने वितळून खाली जाते पण वस्तुचा आकार तसाच राहतो व ते वितळलेले सोने आपल्यास दिले जात नाही, उलट पॉलिश ची मजूरी पण घेतात.
4) बहुतेक लोक सोनाराकडे महिन्याची एक हजार किंवा त्या पेक्षाही जास्त रकमेची पावती लावतात. कोणतीही सिक्युरिटी आपण त्या कडून न घेता देत असतो. हे सरकार मान्य आहे का? किंवा याचे कुठे रजिस्ट्रेशन केले जाते का? हे सरकारी नियमानुसार आहे का ?
आपण जे पैसे देतो, त्यावर स्वतःचे भांडवल म्हणून हे उपयोग करतात. काही पैशांचे सोने घेतात व बाकी उरलेले पैसे तुमच्या आमच्या सारख्या गरजू व्यक्तीला 5 ते 10 ℅ टक्क्याने, सिक्युरिटी घेऊन, मगच व्याजाने देतात.
5) आपण जर एक हजार रुपये त्यांच्याकडे मागितले तर सराफ लगेच सिक्युरिटी मागतो, मग तरीही आपण पैसे देतांना कोणतीही सिक्युरिटी घेत नाही, मग इतका अविश्वास का ?
6) सोने घेतांना, जर दागिना घेतला तर 22 क्यारेट सोने म्हणून देतात व 3 ℅ मजूरी आपल्या कडून घेतली जाते. हेच सोने मोडायला गेल्यावर लगेच घट हा प्रकार 10 ते 20 ℅ पर्यन्त आपल्यावर लादन्यात येतो. म्हणजे आपल्याला 10 ते 20 ℅ सोन्यात फसवलेले असते.
7) स्री वर्ग मंगळसुत्र किंवा पोत यांत मणी टाकतात, किंवा आहेर देण्या साठी मणी घेत असतात. त्या वेळेस सांगितले जाते की मणी ला मजूरी नाही, पण आपणास कोणास माहीत नसते की मणी च्या आत लाख असते व त्या शिवाय मणी ला आकार येत नाही. पण त्याच्या आत लाख ही बहु अंशी तशीच असते व तिच्या वजनासह आपणास विकला जातो यात सराफाचा खुप मोठा फायदा होत असतो.
8) सराफांच्या म्हनण्यानुसार एका ग्रॅम ला 30 रुपये ते 50 रुपये नफा मिळतो आणि दुकानात कमीत कमी 10 ते 15 लोक कामाला ठेवलेले आसतात. एका दिवसाचा दुकानाचा खर्च कमीत कमी 20 ते 30 हजार रुपये असतो. मग इतक्या कमी नफ्यात इतका मोठा खर्च रोज कसा निघतो? म्हणजे रोज किती किलो सोने विकले जाते?
उदा. :- चहा विक्रीत 50 ℅ नफा आहे व चहा रोज सर्वजन पित असतात, तरीही तो विक्रेता गरीबच आहे व राहतो, मग सोने असे किती विकले जाते की इतका मोठा खर्च करुन सुद्धा सराफ श्रीमंत कसे काय? हे रहस्य सर्वाना कळाले पाहिजे.
9) सध्या पान टपरी पेक्षा सराफी दुकाने जास्त झाली आहेत. म्हणजे यात नक्कीच मोठा फायदा असणार आहे.
10) सर्वानी सराफाची महिन्याची पावती बंद करा, दोन ते तीन महिन्यात तुम्हाला दुकानात अर्धा माल दिसेल किंवा बंद झालेले दिसेल. कारण खुपशा सोनारांनी लोकांचा पैसा रियल इस्टेट मध्ये लावलेला आहे व ते क्षेत्र सध्या मंदीचे आहे. रोज जे लोक पैसे देतात त्यावर हे चक्र चालू आहे. हे कधीही बंद पडू शकते. त्या पेक्ष्या सरकारी बैंकां मध्ये सुद्धा आशा स्किम आहेत. त्यात गुंतवा म्हणजे देशाचे तरी कल्याण होईल.
11) स्री वर्ग पायातील पैंजन घेता त्या वेळेस पूर्ण वजनाच्या चांदीची किंमत व मजूरी घेतली जाते. पण मोडायला गेल्यास फक्त ५०℅ रक्कम मिळते. म्हणजे त्यात ५०℅ मिक्स आहे हे सोनाराला माहित असते. पैंजन मध्ये बनवताना चांदी सारखा दिसणारा KDM नावाचा ६ ते ७ रुपये प्रती ग्रॅम चा धातु मिक्स केलेला असतो व आपल्या कडून घेताना पूर्ण चांदीचे पैसे घेतले जातात.
12) दिवाळी व दसऱ्याला सात ते दहा लाखांची फोरव्हीलर कार गिफ्ट केली जाते, म्हणजे किती मोठे प्रॉफिट यात मिळणार असते, कारण घर घालून कोणी धंदा करीत नाही.
😎 ग्राहकांनो जागृत रहा व निट डोळे उघडा..
Comments
Post a Comment