The essence of life

साधं सोप्पं आयुष्य
साधं सोप्पं जगावं |
दिलखुलास हसावं
न लाजता रडावं |
राग आला तर चिडावं
झालं-गेलं वेळीच सोडावं |
साधं सोप्पं आयुष्य
साधं सोप्पं जगावं |
आपल्या माणसांवर हक्कानी रुसावं
रूसलेल्यांना लाडानी पुसावं (विचारावं) |
कोणी नडलाच तर बिनधास्त तोडावं
अडलेल्यांना झटकन सोडवावं !
साधं सोप्पं आयुष्य
साधं सोप्पं जगावं |
वळण येईल तेंव्हा सावकाश वळावं
मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं |
चमचमीत झणझणीत बाहेर दाबून चापावं
घरच्या वरण-भातानेच मात्र पोट भरावं |
साधं सोप्पं आयुष्य
साधं सोप्पं जगावं |
पै पै कमवायला वणवण फिरावं
तरीही मित्रांच्या पार्टीचं बिल हक्कानी भरावं |
हरामखोरांना पुरून उरावं
मदतगारांना आयुष्यभर स्मरावं |
साधं सोप्पं आयुष्य
साधं सोप्पं जगावं |
खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं 
स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं |
सुंदर जग बनवल्याबद्दल मात्र
त्या परमेश्वराचं कौतुक जरूर करावं |
शेवटी साधं सोप्पं आयुष्य आपलं
साधं सोप्पं जगावं |🌿🌿🌿🌿🌿

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034