ताजे पाणी....???


ताजे पाणी....???
आमच्या ठाण्यात सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात चालू आहे. दोन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने, सगळ्या घरांमध्ये बादल्या, पिंप, कळश्या, पातेली, मोठी भांडी...आणि काही घरांमध्ये पेले व वाट्या यामध्ये ही पाण्याचा साठा करून ठेवलेला दिसतो.
बरेचदा हा साठा दोन नाही, तर चक्क ४-५ दिवस पुरेल इतका जास्त असतो.
दोन दिवसांनी जेव्हा पालिकेचे पाणी येते, तेव्हा साहजिकच अगोदर बरेचसे साठवलेले पाणी शिल्लक असते. मग ताजे पाणी आले म्हणून हे शिल्लक राहिलेले पाणी ओतून टाकण्यात येते.प्रत्येक घरातले थोडे थोडे मिळून हजारो लिटर पाणी वाया जाते. केवळ एका खुळचट समजूतीने, ’ ताजे पाणी’.
वस्तुत: ज्या ठिकाणी धरणातून पाणीपुरवठा होतो, तो मागच्या वर्षी जो पाऊस पडलेला असतो, त्या पावसाच्या साठवलेल्या पाण्यातून होतो. म्हणजे, जे पाणी आपण ’ताजे’ म्हणून कौतुकाने पितो, ते साधारणत: ८-९ महिने आधीचे असते. केवळ आपल्या घरी पालिकेद्वारे त्या दिवशी ते येत असते.
जिथे नदी अथवा विहिरीचे पाणी वापरले जाते, तिथे ताजे पाणी ही संकल्पना योग्य ठरते कारण भूमिगत जलस्त्रोतांमुळे सतत ताजे पाणी येत असते.
आपण शहरातील लोकांनी खालील गोष्टींचे पालन केले, तर ’ताजे पाणी’ ह्या चुकीच्या समजूतीमुळे होणारी पाण्याची ही नासाडी सहज टाळू शकतो.
१. जरुरीपुरतेच पाणी साठवून ठेवावे. म्हणजे अतिरिक्त न वापरलेले पाणी ओतून टकण्याचा प्रश्नच येणार नाही.
२. ताजे पाणी आणि शिळे पाणी ह्या कल्पनांना तिलांजली द्यावी.
३. वरील मुद्दे चटकन अंगवळणी पडत नसतील, तर तोवर हे राहिलेले पाणी ओतून न देता, इतर घरगुती गरजांसाठी वापरावे.

’जल है, तो कल है’

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034