पत्रकारितेवर अमीट ठसा उमटवणारा अभ्यासू संपादक गमावला

पत्रकारितेवर अमीट ठसा उमटवणारा
अभ्यासू संपादक गमावला - दयानन्द नेने
----------------------------------------------------------------------------------------------------------
  ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, संपादक अशा विविध भूमिकेतून अरूण टिकेकर यांनी महाराष्ट्राच्या पत्रकारितेवर आपला अमीट ठसा उमटवला असून त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अधिक समृद्ध करणारा संपादक, इतिहासाचे पैलू उलगडून दाखवणारा एक अभ्यासक गमावला आहे.

इंग्रजी साहित्याचे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांच्याकडे आदराने पाहिले जायचे.  त्यांनी काही व्यक्तीचित्रे आणि मुंबई विद्यापीठाचा इतिहासही लेखनीबद्ध केला होता. त्यांचा दै. लोकसत्ता मधील तारतम्य हा स्तंभ खुप गाजला होता. त्यांनी विपूल लेखन ही केले.  विवेकी तसेच आपल्या लिखाणातून सडेतोड भाष्य करणाऱ्या या संपादकाने पत्रकारितेची मूल्य आयुष्यभर जपली होती .
..

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034