#HighCourt observations regarding Ravindra Patil

उच्च न्यायालयाची निरीक्षणे
रविंद्र पाटील बेभरवशाचा साक्षीदार होता
रविंद्र पाटील जबाब बदलत होता
रविंद्र पाटील मीडियाशी बोलत होता
रविंद्र पाटील विसंगत माहिती देत होता
फुकट मेलास रे रविंद्र पाटील, फुकट मेलास
आज सल्लूच्या बाजूने बोलला असतास
तर बाबा सिद्दिकीसारखा मिरवत असतास
सत्य बोलण्याची खाज होती तुला
तुला कुणी सांगितलं होतं नस्ती लफडी करायला
तू मेल्यानं कुणाला काही फरक पडला नाही
तू मेल्यानं निकाल काही वेगळा लागला नाही
तो पडद्यावर झळकत राहिला
तू अंथरुणाला खिळून राहिलास
तो पोरी नाचवत राहिला
तू मात्र खंगत राहिलास
तो अवॉर्ड घेत राहिला
तू धमक्या झेलत राहिलास
तो पोरांचा आयडॉल झाला
तू त्याच्या चाहत्यांचा व्हिलन झालास
म्हणून म्हणतोय...
तू चुकलास रे तू चुकलास
सल्लूच्या बाजूने बोलला असतास
तर बाबा सिद्दिकीसारखा मिरवत असतास
शहीद रविंद्र पाटील अमर रहे!

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034