Bihar elections

#BiharResults

शिवसेनेचा संजय राऊत : दगाबाज की दळभद्री...?

आज समस्त हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी जनता कमालीची हळहळली असता मर्द वाघ म्हणवून घेणाऱ्या सेनेतील एका शिलेदाराचे वक्तव्य अतिशय संतापजनक आहे.

भाजप/मोदीविरोधा पोटी अंध झालेली सेना, केंद्र आणि राज्यात सत्तेत सहभागी असल्याचे भान पूर्णपणे विसरल्याचे दिसते.

अशा बेभान अवस्थेत सेना संपली तर आश्चर्य वाटू नये. अशांना मित्र म्हणावे काय ? आनंदाच्या बेहोशीत नितिशकुमारांना आलिंगन तेवढे बाकी वाटले. ही सेक्युलर मंडळी सेनेला हुंगतही नाही. धुर्तान्च्या गळी बळेच पडण्याचा हा फाजील प्रकार आहे.

विकृत बुद्धिवाद्यांचा वैचारीक दहशतवाद सुरू असता, हे नेभळट कसचा डोमल्याचा "सामना" करणार आहेत ? म्हणे... स्वा.सावरकरांना भारतरत्न द्या.... अरे कपाळकरंटयांनो ग. वा. बेहरेंचे ते जुने साप्ताहिक "सोबत" जरा चाळा. हिंदुत्व म्हणजे काय असते हे जरा समजेल. 

आम्हाला तर आणिबाणीतील संघर्षाचे ते दिवस आठवतात. पण... दिल्लीहून आलेल्या मॅडमच्या एका फोनवर काळ्याकुट्ट आपातकालचे सेनेकडून चक्क समर्थन झाले होते.

बिहार हारल्याच्या दुःखापेक्षा संजय राऊतच्या वक्तव्याच्या वेदना झाल्या. असो, केवळ जातीयवादामुळे झालेला हा पराभव वाटतो. ह्यातूनही काहितरी चांगले उगवेल.

सामना मधून सेनेच्या आरक्षण धोरणाचा देखील उल्लेख व्हावा. बकवासखोर अशावेळी हे करणार नाहीत.
..........
असो.... अनेकानेक आणि दारुण पराभव पचवून जनसंघ ह्या शिखरापर्यंत पोहचला आहे. हेही अपयश पचवून भाजपा पुढे जाईल अशी दीपपर्वात कामना करू या...!

शुभ दीपावली.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034